मुलांना चांगले शिक्षण द्यायचे नाही का हो?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:31 AM2021-09-02T04:31:28+5:302021-09-02T04:31:28+5:30
-------- मालेगाव तालुक्यातील कोतवालांची पदे मालेगाव तालुक्यात कोतवालांची ५७ पदे मंजूर असून सध्या ३८ पदांवर कोतवाल काम करीत ...
--------
मालेगाव तालुक्यातील कोतवालांची पदे
मालेगाव तालुक्यात कोतवालांची ५७ पदे मंजूर असून सध्या ३८ पदांवर कोतवाल काम करीत आहेत. तालुक्यात कोतवालांची १९ पदे रिक्त आहेत. त्यामुळे इतर कोतवालांवर कामाचा ताण पडत असून कोतवालांची रिक्त पदे तातडीने भरण्याची गरज आहे.
-----------------------------------------
कोतवालांना करावी लागणारी कामे : कोतवालांना कार्यालयाची स्वच्छता करणे, वसुलीची कामे करणे, शेतकऱ्यांना बोलावणे, वहिवाट केस असल्यास तेथे उपस्थित राहणे, जळीत झाल्यास पंचनामा करणे, मृत व्यक्ती आढळल्यास तेथे पंचनाम्यासाठी जाणे, वरिष्ठांकडून आदेश आल्यानंतर शासकीय कामासाठी मिळेल त्या वाहनाने खेडेगावात जाणे, ग्रामीण भागात वाहनाची कोणतीही साधने नसतात, त्यामुळे सायकलवरच १५ ते २०५ किमीपर्यंत चकरा माराव्या लागतात.
-----------------------------
पदोन्नती
मालेगाव तालुक्यातील कोतवालांची पदोन्नती झाली आहे. ७ कोतवालांना पदोन्नतीची संधी मिळाली होती. ७ पैकी ३ कोतवाल अनुत्तीर्ण झाले, तर ४ कोतवालांना शिपाई पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. इतर कोतवालांनादेखील पदोन्नती द्यावी, अशी मागणी कोतवाल संघटनेने केली आहे.
---------------------
प्रतिक्रिया : कोतवालांना केवळ ५ हजार रुपये मानधन मिळते. ज्यांची सेवा जास्त झाली आहे त्यांना वेतनवाढ मिळते. ज्यांची सेवा १२ वर्षे झाली आहे त्यांना ७ हजार ५०० रुपये, २० वर्षे सेवा झाली आहे. त्यांना ७ हजार ८५० रुपये आणि ज्यांचे वय ५० वर्षांच्या पुढे आहे अशा कोतवालांना १५ हजार रुपये मानधन शासनाकडून देण्यात देण्यात येते. वेतनवाढीसाठी आंदोलने केली. महसूल मंत्र्यांच्या गावात आंदोलन केले, मात्र मानधन वाढवून मिळाले नाही.
- बापू अहिरे, अध्यक्ष कोतवाल संघटना, मालेगाव तालुका
------------------------
घरात माझ्याशिवाय कमावते कुणी नाही. अत्यल्प मानधनावर कशीबशी गुजराण करावी लागते. शासनाकडे संघटनेने मानधनवाढीसाठी वारंवार प्रयत्न केले, मात्र सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. इतक्या कमी मानधनात कुटुंबाचा भार कसा उचलायचा असा प्रश्न पडला आहे. शासनाने कोतवालांच्या मानधनात भरीव अशी वाढ करावी.
- कैलास जगताप, काेतवाल खायदे ता. मालेगाव