परवानगी नसताना जॉॅॅगिंग ट्रॅकचा घाट कशाला ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 11:42 PM2019-12-18T23:42:48+5:302019-12-19T00:04:34+5:30

पंचवटीतील कुमावतनगर येथील चारीलगतच्या जागेत सव्वा कोटी खर्च करून जॉगिंग ट्रॅक साकारण्याबाबत आता या प्रभागातील भाजप नगरसेवक कमलेश बोडके यांनीच शंका उपस्थित केली आहे. जलसंपदा विभागाची परवानगी नसताना प्रशासनाने इतकी घाई कशासाठी केली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

 Why the pier of the jogging track without permission? | परवानगी नसताना जॉॅॅगिंग ट्रॅकचा घाट कशाला ?

परवानगी नसताना जॉॅॅगिंग ट्रॅकचा घाट कशाला ?

Next

नाशिक : पंचवटीतील कुमावतनगर येथील चारीलगतच्या जागेत सव्वा कोटी खर्च करून जॉगिंग ट्रॅक साकारण्याबाबत आता या प्रभागातील भाजप नगरसेवक कमलेश बोडके यांनीच शंका उपस्थित केली आहे. जलसंपदा विभागाची परवानगी नसताना प्रशासनाने इतकी घाई कशासाठी केली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
महापालिकेची महासभा येत्या शुक्रवारी (दि.२०) होणार आहे. या सभेत पंचवटीतील प्रभाग क्रमांक पाचमधील कॅनॉललगत सव्वा कोटी रुपयांचा जॉगिंग ट्रॅक साकारण्यात येणार आहे. कॅनॉलची जागा जलसंपदा विभागाची असून त्यांची अद्याप स्पष्टपणे परवानगी घेण्यात आलेली नाही अशावेळी हा प्रकल्प साकारण्यावरून शंका उपस्थित केल्या जात आहेत. जागा ताब्यात नसताना इतकी घाई कशासाठी असा प्रश्न केला जात असताना प्रभागाचे नगरसेवक गुरुमित बग्गा यांनी त्याचे समर्थन केले होते. पाटचारीच्या जागेवर अतिक्रमण होऊ नये यासाठी महापालिकेने हा प्रस्ताव तयार केला. त्यासाठी प्रभागातील तीन नगरसेवकांनी प्रत्येकी पंचवीस लाख रुपयांचा निधी दिला आहे. जलसंपदा विभागाने स्थानिक स्तरावर परवानगी देण्यास अडचण नसल्याचे स्पष्ट केला असले तरी आता औरंगाबाद येथील गोदावरी महामंडळाकडून मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे बग्गा यांनी सांगितले असून, महामंडळाकडे पाठविलेल्या पत्राची प्रत सादर केली आहे. आता मात्र याच प्रभागाचे भाजप नगरसेवक कमलेश बोडके यांनी ट्रॅकच्या जागेसंदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत.
मुळात जलसंपदाची परवानगी नसताना इतकी घाई करण्याची गरज नाही. त्यातच या जागेलगत एका खासगी विकासकाची जागा असून, आरक्षित भूखंडावरून महापालिका आणि विकासक यांच्यात न्यायालयीन लढा सुरू असल्याने ही जागा कशी काय मिळू शकते, त्याच प्रमाणे काही भागात डांबरीकरण झाले आहे त्यावर ट्रॅक कसा काय साकारणार असा प्रश्नदेखील बोडके यांनी उपस्थित केला आहे.

Web Title:  Why the pier of the jogging track without permission?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.