शेतकऱ्यांचे प्रश्न का सुटत नाही? हा संशोधनाचा विषय : महादेव जानक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 12:46 AM2018-12-30T00:46:37+5:302018-12-30T00:47:04+5:30
राज्य व केंद्रातील सत्तेतील मंत्री आणि प्रशासकीय सेवेतही माझ्यासारखी आणि प्रशासकीय सेवेत शेतकºयांची मुले कार्यरत असूनही शेतकºयांचे प्रश्न का सुटत नाहीत, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे.
नाशिक : राज्य व केंद्रातील सत्तेतील मंत्री आणि प्रशासकीय सेवेतही माझ्यासारखी आणि प्रशासकीय सेवेत शेतकºयांची मुले कार्यरत असूनही शेतकºयांचे प्रश्न का सुटत नाहीत, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. हाच प्रश्न कृषी क्षेत्राशी संबंधित मंत्री म्हणून मलाही पडला असल्याचे मत व्यक्त करतानाच पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी शेतकºयांच्या प्रश्नांविषयी हतबलता व्यक्त केली आहे. रावसाहेब थोरात सभागृहात शनिवारी (दि.२९) जय किसान फार्मर्स फोरमतर्फे कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी राज्यभरातील शेतकºयांना महादेव जानकर यांच्या हस्ते कृषिरत्न डॉ. पंजाबराव देशमुख प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आले.
व्यासपीठावर आमदार किशोर दराडे, कृषी उपसंचालक डॉ. मंगेश देशमुख, सदुभाऊ शेळके, कर्नल देवीदास पोरजे, आकाशवाणीचे कृषी प्रसारण अधिकारी डॉ. संतोष जाधव आदी उपस्थित होते. महादेव जानकर म्हणाले, सरकारने शेतकºयांच्या हितासाठी विविध योजना व तंत्रज्ञान विकसित केले आहे. परंतु ते प्रत्यक्षात शेतकºयांच्या बांधापर्यंत पोहोचलेच नसल्याची कबुलीही त्यांनी दिली. प्रास्ताविक संजय जाधव यांनी केले.
कॅन्सर, मधुमेहावर गोमूत्राचे औषध
जगभरात मधुमेहावर नियंत्रण मिळविण्यासाठी औषधोपचाराचे संशोधन सुरू असताना महादेव जानकर यांनी गोमूत्रामुळे कॅन्सर दूर ठेवणे शक्य असून, मधुमेहावरही नियंत्रण मिळवणे शक्य असल्याचा दावा करतानाच शेतकºयांनी शेती आणि कृषी तंत्रज्ञानाव्यतिरिक्त बाष्कळ चर्चा करू नये, असे विधान केल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.