मायबाप रसिकांपुढे कशाला पसरावा ‘पसा’?

By admin | Published: November 23, 2015 10:40 PM2015-11-23T22:40:56+5:302015-11-23T22:45:25+5:30

सार्वजनिक वाचनालय : परशुराम साईखेडकर नाट्यगृहातील नियोजित ‘पे अ‍ॅण्ड पार्क’वरून रंगकर्मींसह रसिकांत नाराजी

Why should 'Pasa' be distributed to Mybap Rasukas? | मायबाप रसिकांपुढे कशाला पसरावा ‘पसा’?

मायबाप रसिकांपुढे कशाला पसरावा ‘पसा’?

Next

नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या परशुराम साईखेडकर नाट्यगृहातील नियोजित ‘पे अ‍ॅण्ड पार्क’वरून रंगकर्मींसह सर्वसामान्य रसिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. नाट्यगृहात कार्यक्रमाला येणाऱ्या रसिकांना पार्किंगचा भुर्दंड कशासाठी, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
सार्वजनिक वाचनालयाचे परशुराम साईखेडकर नाट्यगृह हे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असून, तेथे अव्याहत कार्यक्रम सुरू असतात. या नाट्यगृहाच्या दुरुस्ती व रंगरंगोटीचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. हा खर्च वसूल करण्यासाठी नाट्यगृहाच्या आवारात ‘पे अ‍ॅण्ड पार्क’चा घाट घालण्यात आल्याची चर्चा आहे. नाट्यगृहात येणाऱ्या रसिकांकडून दुचाकी वाहनासाठी पाच, तर चारचाकी वाहनासाठी दहा रुपये शुल्क वसूल केले जाणार आहे. याबाबत सार्वजनिक वाचनालयाचा निर्णय झाला असून, नाट्यगृहात सुरू असलेली राज्य नाट्य स्पर्धा संपल्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे या स्पर्धेच्या उद्घाटनाच्या वेळी सांगण्यात आले. त्यामुळे पुढच्या महिन्यापासून नाट्यगृहात येणाऱ्या सर्वसामान्य रसिकांना पार्किंगचा भुर्दंड सोसावा लागण्याची चिन्हे आहेत. नेमक्या याच काळात सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने या नाट्यगृहातच बालनाट्य व संस्कृत नाट्य स्पर्धा रंगणार आहेत.
परशुराम साईखेडकर नाट्यगृहातील बहुतांश कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असतात. आयोजक नाट्यगृहाचे रीतसर भाडे भरून तेथे कार्यक्रम आयोजित करतात. आता मात्र सावानाने ‘पे अ‍ॅण्ड पार्क’ची अंमलबजावणी केल्यास कार्यक्रम मोफत असूनही रसिकांना पार्किंगचे शुल्क मात्र भरावे लागणार आहे. नाट्यगृहाच्या खर्च वसुलीसाठी सामान्य रसिकांसमोर ‘पसा’ पसरण्याची गरजच काय, असा प्रश्न विचारला जात आहे. तसेच याबाबत काही पर्यायही सुचवले जात आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Why should 'Pasa' be distributed to Mybap Rasukas?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.