सिन्नर शहरात नायलॉन मांजाची सर्रास विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2021 10:15 PM2021-12-29T22:15:09+5:302021-12-29T22:15:35+5:30

सिन्नर : नायलॉन मांजा विक्रीवर बंदी असताना आणि मांजा विक्रीवर कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असताना शहर व उपनगरात सर्रासपणे नायलॉन मांजाची विक्री केली जात आहे. नायलॉन मांजा अडकून डिसेंबर महिन्यात पाच ते सहा जण जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

Widespread sale of nylon cats in Sinnar city | सिन्नर शहरात नायलॉन मांजाची सर्रास विक्री

सिन्नर शहरात नायलॉन मांजाची सर्रास विक्री

Next
ठळक मुद्देप्रशासनाची डोळेझाक : अनेक दुचाकीस्वार जखमी

सिन्नर : नायलॉन मांजा विक्रीवर बंदी असताना आणि मांजा विक्रीवर कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असताना शहर व उपनगरात सर्रासपणे नायलॉन मांजाची विक्री केली जात आहे. नायलॉन मांजा अडकून डिसेंबर महिन्यात पाच ते सहा जण जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. दुचाकीस्वारांना मांजा अडकून हात, पाय, गळा चिरून जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मोठी गंभीर घटना घडण्यापूर्वी किंवा एखाद्याचा जीव जाण्यापूर्वी प्रशासनाने गंभीर दखल घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. नायलॉन मांजावरील बंदी केवळ कागदावर असल्याचे चित्र सिन्नर शहर व उपनगरात दिसून येत आहे. सांकेतिक शब्दांचा वापर केल्यास अनेक दुकानांतून नायलॉन मांजा मिळत असल्याची चर्चा आहे. अनेक जण दुकानातून मांजा विक्री पकडली जाऊ शकते या शक्यतेने घरातून अथवा सार्वजनिक जागेतून विक्री करीत आहेत.

मकर संक्रांत जवळ आल्याने पतंगप्रेमींच्या आनंदाला उधाण आले आहे. अशात पतंग काटाकाटीच्या खेळात पतंगप्रेमींकडून नायलॉन मांजाचा सर्रासपणे वापर केला जात असल्याचे चित्र आहे. नायलॉन मांजामुळे अनेकांना इजा होत आहे. पक्ष्यांचा जीव जाण्यासह जखमी होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. गल्लीबोळांत असलेला मांजाचा गुंता आणि मुलांच्या हातात दिसणाऱ्या मांजामुळे नायलॉन मांजा विक्रीवरील बंदी केवळ कागदावरच दिसत आहे. प्रशासनाला नायलॉन मांजाची शंका येऊ नये यासाठी वेगवेगळ्या युक्ती वापरल्या जातात. ग्राहकांकडून कोणताही धोका नसल्याची खात्री पटल्यानंतर मांजा दिला जातो.

लुटुपुटुची कारवाई नको
दरवर्षी नायलॉन मांजामुळे जखमी होण्याचा प्रकार घडल्यानंतर प्रशासनाकडून केवळ लुटुपुटुची कारवाई केली जाते. दिखाव्यासाठी काही मांजाचे बंडल जप्त केले जातात. मात्र, छुप्या पद्धतीने दरवर्षी मांजा विक्री केला जातो.

ह्यमी दुचाकीहून जात असताना माझ्या गळ्यात मांजा अडकला. हेल्मेट व मास्क असल्याने सुदैवाने मी वाचलो. तरीही गळ्याला जखम झाली. संगमनेर नाका ते बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात मांजा रस्त्यावर दिसतो. मोठा अनर्थ होण्याचा धोका संभवतो.
- राहुल पगारे, शिक्षक, सिन्नर

सिन्नर येथे गळ्यात मांजा अडकल्याने दोन दिवसांपूर्वी जखमी झालेले शिक्षक राहुल पगारे. (२९ सिन्नर मांजा)

Web Title: Widespread sale of nylon cats in Sinnar city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.