संशयावरून पत्नीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 12:11 AM2018-04-16T00:11:05+5:302018-04-16T00:11:05+5:30

चांदवड : चांदवड शहरानजीक भैरवनाथनगर परिसरात तात्पुरती झोपडी बांधून उदरनिर्वाहासाठी आलेल्या फिरत्या कुटुंबातील महिलेचा चारित्र्याच्या संशयावरून पतीने खून केला.

Wife's murder on suspicion | संशयावरून पत्नीचा खून

संशयावरून पत्नीचा खून

Next
ठळक मुद्देचांदवड : फिरस्त्या कुटुंबातील संशयिताला अटक भैरवनाथनगर येथे झोपडीत ही घटना घडली


चांदवड : चांदवड शहरानजीक भैरवनाथनगर परिसरात तात्पुरती झोपडी बांधून उदरनिर्वाहासाठी आलेल्या फिरत्या कुटुंबातील महिलेचा चारित्र्याच्या संशयावरून पतीने खून केला.
२४ तासांच्या आत संशयित पतीस ताब्यात घेतले. त्याने खून केल्यानंतर विषारी औषध सेवन केल्याने त्यास अधिक उपचारासाठी मालेगाव येथे रवाना करण्यात आले आहे. शनिवारी (दि. १४) सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
झोपडीस लाकडे लावण्यासाठी जंगलात जाऊन लाकडे (कुड) घेऊन येतो असे सांगून गेली ती परत आली नाही म्हणून शेजारीच राहणारे रमेश शिंदे यांचे सासरे संतोष गोजीराम सावंत यांनी मुलगी का आली नाही याची चौकशी केली. मात्र मुलगी सापडली नाही. दरम्यान, भैरवनाथ मंदिराजवळील नाल्यात रविवारी (दि. १५) सकाळी १० वाजेच्या सुमारास अनिता रमेश शिंदे हिचा मृतदेह सापडला. घटनास्थळी चांदवडचे पोलीस निरीक्षक अनंत मोहिते, पोलीस उपनिरीक्षक कैलास चौधरी, रामचंद्र जगताप, पोलीस कर्मचारी हे गेले. त्यांनी मयत महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. चांदवड उपजिल्हा रुग्णालयात आणला. यावेळी अनिता हिचा गळा आवळून खून केल्याचे लक्षात आले. दरम्यान, मुलीचे वडील संतोष गोजीराम सावंत यांनी चांदवड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रमेश नाना शिंदे हा कामधंदा करीत नव्हता. तसेच दारू पिण्याचे व्यसन होते. तो सतत मुलगी अनिता हिस चरित्र्याच्या संशयावरून मारहाण करीत असे. त्याने तर आता तिचा गळा दाबून खून केला आहे.
चांदवड पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक अनंत मोहिते करीत आहेत. मयत अनिता हिच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी असून, तेजाबसारखे विषारी औषध रमेश शिंदे याने सेवन केल्याने पोलिसांनी त्यास मालेगाव येथे अधिक उपचारासाठी रवाना केले.मुंबई-आग्रा महामार्गालगत नियोजित हेलिपॅडजवळ असलेल्या नाल्यात तात्पुरती झोपडी बांधून उदरनिर्वाहासाठी आलेले दांपत्य स्टोव्ह व गॅस दुरुस्तीचा व्यवसाय करणारे रमेश नाना शिंदे (२७), कायम रा. गुढे, ता. भडगाव, जि. जळगाव हे आपली पत्नी अनिता रमेश शिंदे (२५) भैरवनाथनगर येथे राहतात. याच झोपडीत ही घटना घडली.

Web Title: Wife's murder on suspicion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा