कंधाणेत जंगली श्वापदांचा वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 07:00 PM2018-09-21T19:00:57+5:302018-09-21T19:02:03+5:30
शेतीशिवारातील नागरिक अद्यााप सिंगलफेज योजनेच्या प्रतिक्षेत आहेत. परिसरात जंगली श्वापदांचा वावर वाढल्याने अंधारात जीवन जगणे कठिण झाले आहे.
कंधाणे: शेतीशिवारातील नागरिक अद्यााप सिंगलफेज योजनेच्या प्रतिक्षेत आहेत. परिसरात जंगली श्वापदांचा वावर वाढल्याने अंधारात जीवन जगणे कठिण झाले आहे.
शिवारात अंधाराचे साम्राज्य पसरले असून शालेय विदयार्थांना शालेय अभ्यास एकतर सकाळी किंवा रात्री दिवा लावून करावा लागत असल्याचे चित्र हया भागात पाहावयास मिळत आहे. गावागावात सुरळीत वीजपुरवठा, वीज योजनांचा कितीही प्रचार केलापरंतू ग्रामीण भागात याबाबत दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसतआहे.
कंधाणे गावाला डांगसौदाणे सबस्टेशन कडून विद्युत पुरवठा केला जात आहे सबस्टेशन अंतर्गत गावाला सिंगल फेज योजनातंगर्त सुरळीत विद्युत पुरवठा केला जात आहे पण हया भागातील शेतीशिवारातील नागरिक अदयापर्यंत सिंगल फेज योजनेच्या प्रतिक्षेत आहेत शेतीशिवारातील मीटर धारकांची संख्या मोठयाप्रमाणात आहे फक्त दिवसा मिळणा-या विदयुत पुरवठयाच्या बदल्यात नागरिकांनकडून आवाच्या सव्वा बीले आकारली जात आहेत हया परिसरात नदी,जंगल परिसर असल्याने हया भागात अनेक जंगलीश्वापदांचा सर्सस वावर या परिसरात राहतो गेल्या दोन तीन वर्षाचा लेखा-जोखा पाहाता अंधाराचा फायदा घेत बिबटयाच्या हल्ल्यात अनेक पशुधन ठार झाल्याच्या घटना या परिसरात घडल्या आहेत .या भागातील शालेय विद्यार्थी वर्गाला रात्रि च्या अभ्यास साठी रॉकेलच्या दिव्यांचा वापर करावा लागत आहे .या भागातील जोरण सबस्टेशन कडून शेतीसिंगल फेज योजना राबविली जात असतांना डांगसौदाणे सबस्टेशन कडून अदयाप पर्यंत ही योजना राबविली जात नसल्याने नागरिकांना कडून आश्चर्य व्यक्त केले जात आह.े मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकींनी दरम्यान विद्यमान लोकप्रतिनिधींन कडून हया भागातील शेतीसिंगल फेज योजना कार्यान्वित करण्याचे आश्वासन दिले होते पण अद्याप पर्यंत संबधितांन कडून कोणतीही कार्यवाही केली जात नसल्याने कंधाणे वासीयांच्या नशीबी अंधार म्हण्याची वेळ नागरिकांन वर येवुन ठेपली आहे.