वन्यजीव, पक्ष्यांसाठी खाद्य, पाण्याची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:13 AM2021-03-07T04:13:56+5:302021-03-07T04:13:56+5:30

पूर्व भागातील सामनगाव, चाडेगाव, चांदगिरी, मोहगाव आदी गावांमध्ये वनक्षेत्रामध्ये (जंगलात) जवळपास १०० ते १५० ठिकाणी वन्यपक्षी यांच्यासाठी उन्हाळ्याचे खाद्य, ...

Wildlife, food for birds, water | वन्यजीव, पक्ष्यांसाठी खाद्य, पाण्याची सोय

वन्यजीव, पक्ष्यांसाठी खाद्य, पाण्याची सोय

Next

पूर्व भागातील सामनगाव, चाडेगाव, चांदगिरी, मोहगाव आदी गावांमध्ये वनक्षेत्रामध्ये (जंगलात) जवळपास १०० ते १५० ठिकाणी वन्यपक्षी यांच्यासाठी उन्हाळ्याचे खाद्य, पाणी यांची वन्यजीव प्रेमींंच्या मदतीने सोय केली आहे. सध्या कडक ऊन तापू लागल्याने उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. अशा वेळी वन्यजिवांना चारा, पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू शकते. या गोष्टीचा विचार करून या कामासाठी वन्यजीव प्रेमी, प्रत्येक गावातील पोलीसपाटील, ग्रामस्थांनी श्रमदानातून आपापल्या परिसरातील शिवारात, जंगलात, अंगणात, गॅलरी, बाल्कनीत वन्यपक्ष्यांसाठी खाद्य, पाणी उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सदरचे काम हे उपवनसंरक्षक पश्चिम भाग नाशिकचे पंकज गर्ग, सहायक वनसंरक्षक झोले, वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे, वनपरिमंडळ अधिकारी अनिल अहिरराव, वनरक्षक गोविंद पंढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

(फोटो ०६ वन) चांदगिरी शिवारात वन्यजीव पशुपक्ष्यांसाठी खाद्य, पाण्याची सोय करताना वनरक्षक गोविंद पंढरे, पोलीसपाटील लखन कटाळे वन्यजीवप्रेमी.

Web Title: Wildlife, food for birds, water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.