वन्य प्राणी, पशुपक्ष्यांसाठी तयार केले तळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 07:18 PM2019-05-08T19:18:55+5:302019-05-08T19:19:23+5:30

औंदाणे : बागलाण तालुक्यात ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा नागरिकांसह वन्यप्राणी पशुपक्ष्यांना जाणवत असून येथील प्रहार शेतकरी संघटनेने वन्य प्राणी व पशुपक्ष्यांसाठी औंदाणे येथील सुकनाला परिसरात तळे तयार करून पाणी उपलब्ध करून दिले आहे.

Wildlife, ponds prepared for wild animals | वन्य प्राणी, पशुपक्ष्यांसाठी तयार केले तळे

वन्य प्राणी, पशुपक्ष्यांसाठी तयार केले तळे

Next
ठळक मुद्देसुकनाला परिसरात तळे तयार करून पाणी उपलब्ध करून दिले

औंदाणे : बागलाण तालुक्यात ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा नागरिकांसह वन्यप्राणी पशुपक्ष्यांना जाणवत असून येथील प्रहार शेतकरी संघटनेने वन्य प्राणी व पशुपक्ष्यांसाठी औंदाणे येथील सुकनाला परिसरात तळे तयार करून पाणी उपलब्ध करून दिले आहे.
अल्प पाऊस व जमिनीची खालावलेली पाण्याची पातळी त्यामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यावर्षी दुष्काळासह गामीण भागात शेतकरी वर्गाला याचा फटका बसत आहेत. पाणीटंचाईसह चारा टंचाई ही मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचे अध्यक्ष तुषार खैरनार यांनी सुकडनाला परिसरात पशुपक्षी वन्य प्राण्यांसाठी छोटेसे तळे तयार करून पाणी उपलब्ध करून दिले आहे.
या प्रसंगी वनविभागाचे वनपाल एन. एन. गांगुर्डे, जयप्रकाश शिरसाठ, वनरक्षक शीतल दैतकार, गौतम पवार, वनविभागाचे इजाज शेख, प्रहारचे संघटक महेंद्र खैरनार, शहर प्रमुख रु पेश सोनवणे, कपिल सोनवणे जाधव, तुषार रौंदळ आदी उपस्थित होते.

चौकट -
दहा दिवसापुर्वी पाण्याच्या शोधात कोरड्या शेततळ्यात उतरलेल्या घोरपडीला वनविभागाने ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढले व तळे तयार करण्याची संकल्पना सुचली. त्यानंतर तळ्याची निर्मिती करण्यात आली. आता पशु पक्षी वन्य प्राण्यांची तहान भागणार आहे.
- तुषार खैरनार
अध्यक्ष, प्रहार शेतकरी संघटना.
 

Web Title: Wildlife, ponds prepared for wild animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.