भोर विद्यालयात वन्यजीव सप्ताह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 06:49 PM2019-10-15T18:49:42+5:302019-10-15T18:52:45+5:30
ठाणगाव : येथील रयत शिक्षण संस्थेच्या पुंजाजी रामजी भोर विद्यालयामध्ये वन्यजीव सप्ताह व जॉय आॅफ गिविंग वीकच्या निमित्ताने विविध कार्यक्र म आयोजित करण्यात आले होते.
ठाणगाव : येथील रयत शिक्षण संस्थेच्या पुंजाजी रामजी भोर विद्यालयामध्ये वन्यजीव सप्ताह व जॉय आॅफ गिविंग वीकच्या निमित्ताने विविध कार्यक्र म आयोजित करण्यात आले होते.
वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित सर्प चित्रांच्या प्रदर्शनाचे उदघाटन स्थानिक शाळा समितीचे सदस्य डी. एम. आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनामध्ये विविध विषारी, बिनविषारी सापांच्या छायाचित्रांच्या सोबत त्या सर्पाची ओळख तसेच त्यांचे वैशिष्ट्ये, रहिवास, सर्प दंश झाल्यास घ्यावयाची काळजी याबाबत माहिती देण्यात आली.
इको क्लबच्या इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी ‘वन्यजीव वाचवा’ या संकल्पनेवर आधारित देखाव्यांची निर्मिती केली होती. या देखाव्यामध्ये डोंगर, गुहा, तळे, वनस्पती, पाणी आणि पशु-पक्षी आदी वन्यजीवांच्या प्रतिकृतींची मांडणी केली होती. हे वन्यजीव का महत्वाचे आहेत, तसेच अन्नसाखळी कशी तयार होते, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व माहिती सांगून वन्यजीवांना वाचिवण्याचे आवाहन केले या प्रदर्शनाचे उदघाटन प्राचार्य व्ही. एस. कवडे यांनी केले.
इको क्लबच्या इयत्ता सहावी व नववीच्या विद्यार्थांनी टाकाउ पासून टिकाऊ, पुनर्वापर या संकल्पनेतून कापडी व कागदी पिशव्या बनविल्या व त्यांचे प्रदर्शन विद्यालयात भरविण्यात आले. पर्यवेक्षक बी. बी. पगारे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या पिशव्यांच्या विक्र ीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
हरितसेना विभाग प्रमुख वाय एम रु पवते, जीवशास्त्र विभागाचे व्ही. एस. वाघचौरे, मूलभूत तंत्रज्ञान विभागाचे शिक्षक एस. डी. सरवार, करिष्मा वाघ, अझर मणियार, ए. बी. कचरे आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्र मास एस. एस. शेणकर, आर. सी. काकड, एस. ओ. सोनवणे, के. बी. भारमल, डी. बी. दरेकर, एच. डी. कापडणीस, व्ही. बी. वाळुंज, एस. पी. रेवगडे, आर. बी. दिवटे, जी. एस. कापडणीस आदींसह ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.