आदिवासींचे हित जोपासणार

By admin | Published: November 12, 2016 11:12 PM2016-11-12T23:12:52+5:302016-11-12T23:12:42+5:30

बी. राधाकृष्णन : सुरगाणा तालुक्यातील अलंगुण येथील बंधाऱ्याचे जलपूजन

Will create the interest of tribals | आदिवासींचे हित जोपासणार

आदिवासींचे हित जोपासणार

Next

 सुरगाणा : वनजमिनींचे पट्टे वाटप करताना आदिवासी बांधवांचे हित जोपासले जाईल. वनकायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाईल. वनजमीन वाटप करताना आदिवासींचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल याकडे लक्ष दिले जाईल. कोणाचेही नुकसान होणार नाही याची सर्वतोपरी काळजी घेतली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी करंजूल येथे वनजमीन लाभार्थी भूमिहीन शेतकऱ्याची वनपट्ट्याची प्रत्यक्ष पाहणी करताना दिले.
यावेळी आमदार जिवा पांडू गावित, वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी मुख्य वनसंरक्षक रामानुजन, वनकायदा समन्वयक श्रीमती कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी कान्हूराज बगाटे, टी. बिर्ला, जगताप, सहायक जिल्हाधिकारी डी. गंगाथरण, तहसीलदार अरुण शेलार, गटविकास अधिकारी केशव गड्डापोड, आदि वरिष्ठ अधिकारी तसेच रामजी गावित, युवानेते इंद्रजित गावित, सुभाष चौधरी, भिका राठोड, वसंत बागुल, धनजी चौधरी, मंदाकिनी भोये, आनंदा चव्हाण, लक्ष्मी चौधरी, उत्तम कडू, विजया विजय घांगळे, के. डी. भोये, संजाबाई खंबाईत, भीमाशंकर चौधरी, संजय पवार, गंगाराम गवळीसह शेतकरी, सरपंच, उपसरपंच आदि उपस्थित होते.
नार नदीवर खोबळा येथे सीमेंट बंधारे बांधण्याची मागणी आमदार जे. पी. गावित यांनी केली. यावेळी उंबरदे पुलाची पाहणी केली. हातरुंडी ग्रामस्थांनी पारंपरिक वाद्य संबळ, पावरी, वाजवून स्वागत केले.
अलंगुण येथील आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळाच्या आश्रमशाळेतल्या मुलांना मार्गदर्शन केले. आमदार गावित यांनी संवर्धन केलेल्या सागवान झाडांची पाहणी केली. अलंगुण येथील सीमेंट कॉँक्रीट बंधाऱ्याचे जलपूजन करण्यात आले. यावेळी सर्वच क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच, शेतकरी, अधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Will create the interest of tribals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.