कंत्राटी कर्मचाऱ्यांचे भवितव्य आज ठरणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:34 AM2018-05-14T00:34:47+5:302018-05-14T00:34:47+5:30
नाशिक : गेल्या एक मेपासून आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कर्मचारी ‘समान काम, समान दाम’ या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले असून, आजवर आठ कर्मचाºयांची प्रकृती खालावली असतानाही विद्यापीठ प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने याप्रकरणी आता पोलीस आयुक्त मध्यस्थाची भूमिका बजविणार आहे. त्यामुळे सोमवारी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांची याप्रकरणी चर्चा झाल्यानंतर विद्यापीठाला आवश्यक तो निर्णय घ्यावा लागणार असल्याचे चित्र आहे. दरम्यान रविवारी आणखी एका कर्मचाºयाला रूग्णालयात दाखल करण्यात आले. अर्थात विद्यापीठाकडून सातत्याने याप्रकरणी पळवाट शोधली जात असल्याने प्रशासनाची दिशाभूल करणाºया संबंधिताना जिल्हाधिकाºयांनीच ताकीद दिली पाहिजे, अशी अपेक्षा आंदोलनकर्ते कर्मचारी व्यक्त करीत आहेत. आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाºयांनी ‘समान काम, समान दाम’ या मागणीबरोबरच निलंबित कर्मचाºयांसह सर्व कंत्राटी कामगारांना सेवेत घेण्याच्या मागणीसाठी गेल्या पाच महिन्यांपासून संघर्ष करीत आहेत. विद्यापीठात गेल्या आठ ते दहा वर्षांपासून अवघ्या पाच ते सहा हजार रुपयांवर काम करणाºया कर्मचाºयांना त्यांच्या कामाचा पुरेसा मोबदला आणि अपेक्षित भत्ते मिळत नसल्याने कर्मचाºयांनी आवाज उठविला आहे. सदर प्रकरणी विद्यापीठाची कंत्राटी नऊ कर्मचाºयांना कामावरून काढून टाकल्याने सर्वच कंत्राटी कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. तत्पूर्वी विद्यापीठ प्रशासन आणि कर्मचारी यांच्यात अनेकदा चर्चा झाली मात्र विद्यापीठाने कंत्राटी कर्मचाºयांना कोणतीही हमी न दिल्याने कर्मचाºयांनी निषेध व्यक्त करीत कामबंद आंदोलन पुकारले आहे. गेल्या पाच महिन्यांपासून कंत्राटी कर्मचारी विद्यापीठासमोर उपोषणाला बसलेले आहेत. मात्र एकदाही विद्यापीठाकडून कुणीही भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केलेली नाही. याउलट पोलिसांना बोलावून दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही कर्मचाºयांना पोलीस म्हसरूळ पोलीस ठाण्यातही घेऊन गेले होते. आंदोलनाच्या जागेवर विद्यापीठाने हरकतही घेतली होती. विद्यापीठ सातत्याने मुख्यमंत्र्यांच्या नावाचा वापर करून दबाव निर्माण करीत असल्याची तक्रारही कर्मचाºयांकडून होत आहे.