अनुदानित बियाणे मला मिळणार का रे भाऊ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:15 AM2021-05-27T04:15:12+5:302021-05-27T04:15:12+5:30
चौकट- यंदा खरीप हंगामात कृषी विभागाकडून अनुदानित बियाणे देण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांनी त्यासाठी महाडीबीटी पाेर्टलवर ऑनलाईन अर्ज दाखल ...
चौकट-
यंदा खरीप हंगामात कृषी विभागाकडून अनुदानित बियाणे देण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांनी त्यासाठी महाडीबीटी पाेर्टलवर ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्यावतीने करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत जिल्हाभरातील १२ हजार ४०३ शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात याला अल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसते.
चौकट-
कोणत्या योजनेसाठी किती अर्ज ?
बैल चलित औजार - ३९९०
शेतकरी गटांसाठी औजार बँक - १२९
फळबागांसाठी लागणारे औजारे - ७१२
पॉवर टीलर - ४२९७
स्वयंचलित मशिनरी -२८१०
ट्रॅक्टर - ४३९३२
ट्रॅक्टरवर चालणारी औजार - ७७०९७
चौकट-
सर्वाधिक अर्ज यांत्रिक शेतीसाठी
कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातून एकूण १३७६६९ शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले असून यात सर्वाधिक अर्ज यांत्रिकीकरणासाठीचे आहेत. ट्रॅक्टरवर चालणाऱ्या औजारांसाठी एकूण ७७ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. ट्रॅक्टरसाठीही मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
कोट-
मागीलवर्षी महाबिजचेही बियाणे बोगस निघाले होते. यामुळे पेरणीचा खर्च वाया गेला होता. यावर्षी किमान अनुदानावर बियाणे मिळाले तर थोडाफार दिलासा मिळू शकेल. मात्र, लॉटरीमुळे त्याचाही अद्याप अंदाज येत नाही - कुणाल रसाळ , शेतकरी
कोट-
ट्रॅक्टर घेण्यासाठी अनुदान मिळावे म्हणून मी अर्ज केला आहे. मात्र, त्याची प्रतीक्षा यादी मोठी आहे. यामुळे नंबर केव्हा लागणार काही सांगता येत नाही. अल्पभूधारक असल्यामुळे रोख स्वरुपात ट्रॅक्टर घेणे परवडणारे नाही. - आप्पा गोधडे, शेतकरी
तालुकास्तरावरून मिळणार माहिती
अनुदानित बियाण्यासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांची यादी तालुका कृषी कार्यालयात पाठविण्यात येणार असून तालुका स्तरावरून शेतकऱ्यांना त्याची माहिती दिली जाणार आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांना परमिट देण्यात येणार असून त्यांनी महाबिज आणि राष्ट्रीय सीड काॅर्पोरेशनच्या केंद्रावर जाऊन परमिट दाखविल्यानंतर त्यांना अनुदान वजा करून बियाण्याची रक्कम द्यावी लागणार आहे.
चौकट-
अनुदान वजा करून पैसे द्या
ज्या शेतकऱ्यांचा अनुदानित बियाण्यासाठी नंबर लागला आहे. त्यांना तालुका स्तरावरून माहिती दिली जाईल. त्यांच्या मोबाईलवर तसा संदेशही येईल. त्यानंतर शेतकऱ्यांनी परमिट घेऊन संबंधित बियाणे विक्री केंद्रावर जाऊन बियाणे घ्यायचे आहे. यावेळी अनुदानाची रक्कम वजा करूनच पैसे द्यावे लागणार आहेत.