आयटीआयला प्रवेश मिळेल का रे भाऊ; साडेसहा हजार जागांसाठी ४७ हजार अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:13 AM2021-07-26T04:13:43+5:302021-07-26T04:13:43+5:30
आयटीआयला प्रवेश घेतला म्हणजे नोकरीची संधी पक्की अशी एकेकाळी समजूत होती. ती आजही काही प्रमाणात कायम आहे, आयटीआयसोबतच ॲप्रेंटीसशीपच्या ...
आयटीआयला प्रवेश घेतला म्हणजे नोकरीची संधी पक्की अशी एकेकाळी समजूत होती. ती आजही काही प्रमाणात कायम आहे, आयटीआयसोबतच ॲप्रेंटीसशीपच्या निमित्ताने कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव मिळतो. या अनुभवासोबतच संबंधित कंपनी अनुभवी कर्मचारी म्हणून नियुक्ती देते अथवा दुसऱ्या कंपनीत नोकरीची संधी मिळते अशीच काहीशी परिस्थिती आजही दिसून येते. त्यामुळे आयटीआय प्रवेशाकडे विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात कल दिसून येत आहे. कोरोना संकटामुळे गेल्या वर्षी काही प्रमाणात आयटीआय प्रवेश घल्याचाचे दिसून आले मात्र गेल्यावर्षी प्रवेशाचे समीकरण जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी ७० टक्के व बाहेरील विद्यार्थ्यांसाठी ३० टक्के होते. त्यात यावर्षी बदल करण्यात आला असून यावर्षी जिल्ह्यातील ९० टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहे. त्यामुळे यावर्षी प्रवेशित विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
अर्ज स्थिती
एकूण जागा -६६२४
आतापर्यंत आलेले अर्ज -४७,२५७
---
उपलब्ध जागा-
शासकीय जागा -४,९३२
खासगी जागा -१,६९२
---
संस्था
शासकीय संस्था - १५
खासगी संस्था -१६
---
सर्वांनाच हवा ‘फिटर’ ट्रेड
१) आयटीआय प्रवेशासाठी सर्वच विद्यार्थ्यांकडून फिटर ट्रेडला सर्वाधिक पसंती दिली जाते.
२) टर्नर ट्रेडची मागणी करणारे विद्यार्थीही मोठ्या प्रमामात आहेत.
३) बदलत्या काळानुसार, इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स ट्रेडकडेही विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे.
४ विविध पर्याय उपलब्ध असले तरी पहिली पसंती ही फिटर ट्रेडलाच असल्याचे मागील प्रवेश प्रक्रियांमधून दिसते.
विद्यार्थी म्हणातात...
आयटीआय केलेल्या विद्यार्थ्यांना ॲप्रेंटीसशीपच्या माध्यमातून तत्काळ नोकरीची संधी उपलब्ध होत असल्याने आटीआयला प्रवेश घेण्याचे ठरविले आहे. शिवाय हाताशी कौशल्य असले तरी कोणताही व्यावसाय करणेही शक्य होते.
- विशाल जाधव, विद्यार्थी
---
शासकीय आआटीआयच्या माध्यमातून किमान खर्चात कौशल्य शिक्षण मिळते, शिवाय नोकरीच्या संधीही प्राप्त होतात. तुलनेत अन्य संस्थांमध्ये कौशल्य शिक्षण घेण्यासाठी अधिक खर्च व कालावधी लागत असल्याने आयटीआयचा पर्याय निवडला.
- हर्षल यादव, विद्यार्थी
गतवर्षी १५ टक्के जागा रिक्त
- गेल्या वर्षी कोरोना संकटामुळे सर्वच विद्या शाखांमधील प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटली होती. त्याचा परिणाम आयटीआय प्रवेशांवरही झाल्याने सुमारे १५ टक्के जागा रिक्त दिसून आल्या होत्या.
- गतवर्षी आयटीआय प्रवेशासाठी जिल्ह्यातील ७० टक्के विद्यार्थ्यांना तर जिल्ह्याबाहेरील ३० टक्के विद्यार्थ्यांना प्रवेशाचा नियम होता. परंतु, बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये घट झाल्याने जागा रिक्त राहिल्याचे दिसून आले.
- विविध अभियांत्रिकी विद्या शाखेच्या वाढलेल्या जागा आणि वेवेगळ्या व्यावसायिक अभ्यासक्रमाचे पर्याय उपलब्ध झाल्याने आयटीआय प्रवेशाच्या रिक्त जागांचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले.