कांद्याची उपलब्धता आॅनलाइन कळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 11:55 PM2020-04-02T23:55:19+5:302020-04-02T23:55:41+5:30
भारतभर कोरोनामुळे विविध राज्यात शेतीमालाचा तुटवडा होऊ नये व रास्त दरात सामान्य जनतेला जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात याकरीता बाजार व्यवस्था व मालवाहतूक व्यवस्थेवर काही अंशी मर्यादा आल्या आहेत. मात्र आता नाशिक जिल्ह्यात कांदा या शेतीमालाची देशभरात उपलब्धता व शासन स्तरावर कोणत्या ठिकाणी व्यापारी अगर थेट शेतकरी तसेच शेतकरी उत्पादकांच्या संस्था सांघिक सहकारी व्यवस्थ्ेकडे किती प्रमाणात कांदा माल विक्र ीस उपलब्ध आहे याची आॅनलाईन माहिती तयार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पणन मंडळाचे पुणे येथील सरव्यवस्थापक सुनील पवार व नाशिक येथील पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक चंद्रशेखर बारी यांनी दिली आहे.
लासलगाव : संपूर्ण भारतभर कोरोनामुळे विविध राज्यात शेतीमालाचा तुटवडा होऊ नये व रास्त दरात सामान्य जनतेला जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात याकरीता बाजार व्यवस्था व मालवाहतूक व्यवस्थेवर काही अंशी मर्यादा आल्या आहेत. मात्र आता नाशिक जिल्ह्यात कांदा या शेतीमालाची देशभरात उपलब्धता व शासन स्तरावर कोणत्या ठिकाणी व्यापारी अगर थेट शेतकरी तसेच शेतकरी उत्पादकांच्या संस्था सांघिक सहकारी व्यवस्थ्ेकडे किती प्रमाणात कांदा माल विक्र ीस उपलब्ध आहे याची आॅनलाईन माहिती तयार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पणन मंडळाचे पुणे येथील सरव्यवस्थापक सुनील पवार व नाशिक येथील पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक चंद्रशेखर बारी यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात व विशेषत: नाशिक जिल्हा पुणे अहमदनगर , जळगाव , धुळे व सोलापूर या जिल्ह्यात कांदा उत्पादन व बाजार समितीत विक्र ी होते. परंतु मजुरा अभावी बाजार समितीच्या लिलावावर काही मर्यादा आलेल्या आहेत.
त्यामुळे देशभरात कांदा माल उपलब्धता व व्यवहार खरेदीदार व विक्र ेता यात थेट फोनने अगर आॅनलाईन पध्दतीने होऊन विक्र ी नंतर हा शेतीमाल खरेदी झालेल्या शहरात पोहोचविण्याकरीता लागणारी मालवाहतूक अगर अधिक माल असेल तर थेट रेल्वेने रॅकची व्यवस्था करून पोहाचवण्यासाठी तसेच यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वरिष्ठ अधिकारी मदत व सहकार्य करणार आहेत. शेतीमालाची विक्र ी अवघ्या भारतभर झाली तर या स्थितीत कांदा व शेतीमालाला चांगले दर मिळावे व मालाची पाठवणी व्हावी, त्याचबरोबर तातडीने नागरी वस्तीत लागणारा शेतीमाल उपलब्ध व्हावा याकरीता संपूर्ण देशात व विविध राज्यात शेतीमाल उपलब्धता यादी तात्पुरती तयार करण्यात आली असल्याचे चंद्रशेखर बारी यांनी सांगीतले. व्यापारी व शेतकरी तसेच शेतीपुरक संस्थेच्या नावाची व मालाची उपलब्धता याबाबतची माहिती शासनाच्या महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ वेबसाईटवर उपलब्ध असुन याचा वापर करून खरेदी विक्र ी करावी व काही मालखरेदी व पाठवण्यासाठी काही समस्या निर्माण झाली तर संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे.
कोरोनाने अवघ्या भारतभर लॉकडाऊनमुळे विविध भागात उत्पादीत झालेला शेतीमाल विविध राज्यात उपलब्ध होत नाही़ नागरिकांना टंचाई जाणवू नये या करीता केंद्र सरकारने विविध राज्यात उत्पादकांच्या व शेतीमालाची खरेदी- विक्र ी करणारे व्यापारी व विविध सहकारी संस्था यांच्याकडे कोणत्या मालाची उपलब्धता आहे व तो खरेदीकरीता कसा उपलब्ध होईल यासाठी समांतर पर्यायी माहिती तयार होण्यासाठी यादी तयार केली आहे. यावर विविध राज्यातील वरीष्ठ अधिकारी नियंत्रण व समन्वयाची भुमिका बजावणार आहेत.
- सुनील पवार , सरव्यवस्थापक महाराष्ट्र राज्य पणन मंडळ, पुणे