संपामुळे मनपा कर्मचाऱ्यांचे वेतन कापणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 12:39 AM2020-01-09T00:39:32+5:302020-01-09T00:39:47+5:30
नाशिक : मुळात केंद्र शासनाच्या विरोधातील आंदोलन त्यात महापालिकेच्या प्रश्नांवर कामगार कर्मचारी कृती समितीने संप पुकारला आणि ऐन स्वच्छ ...
नाशिक : मुळात केंद्र शासनाच्या विरोधातील आंदोलन त्यात महापालिकेच्या प्रश्नांवर कामगार कर्मचारी कृती समितीने संप पुकारला आणि ऐन स्वच्छ सर्वेक्षणाच्या कालावधीत सफाई कामगारदेखील संपात सहभागी झाल्याने महापालिकेला धक्का बसला. आता राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे कारवाई करण्याची तयारी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सुरू केली असून, काम नाही तर वेतन नाही या निर्देशाप्रमाणे कर्मचाºयांचे एक दिवसाचे वेतन कापले जाण्याची शक्यता आहे.
देशपातळीवर पुकारण्यात आलेला कामगार कर्मचाºयांचा संप हा केंद्र सरकारच्या धोरणाच्या विरोधात होता. महापालिकेतील कर्मचाºयांचे प्रश्न स्थानिक आणि फार तर राज्य शासनाशी संबंधित होते. त्यामुळे आंदोलन करू नये, अशी भूमिका महापालिकेने घेतली. आयुक्त गमे यांनी तर सध्या स्वच्छ शहर सर्वेक्षण होणार असून, त्यासाठी केंद्र सरकारचे पथक कोणत्याही क्षणी येऊ शकते. त्यामुळे संपात सहभागी होऊ नये, असे आवाहन संघटनेचे लोकप्रतिनिधी असलेल्या नेत्यांना केले होते. परंतु उपयोग झाला नव्हता, असे त्यांनी सांगितले. संपाबाबत राज्य शासनानेच निर्देश असून त्यानुसार संपात सहभागी झालेल्यांवर काय कारवाई हे अध्यादेशात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
अत्यावश्यक सेवेबाबत संभ्रम
सफाई कामगारांची सेवा तसेच घंटागाड्यांचे कामगार या अत्यावश्यक सेवेत येतात काय याबाबत महापालिकेच्या परसेवेतून आलेल्या अधिकाºयांमध्ये संभ्रम आहे. काहींनी ही सेवा अत्यावश्यक आहे तर काहींनी नाही, असे सांगितले. तथापि, त्याबाबत कोणीही स्पष्ट सांगू शकले नाही. संबंधितांवर कारवाई करण्याबाबतदेखील आयुक्तच निर्णय घेतील, असे सांगून संबंधित अधिकाºयांनी स्वत:ची सोडवणूक करून घेतली.