आरोग्य सुविधेतील हलगर्जीपणा खपवून घेणार नाही : दादा भुसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 10:49 PM2020-04-23T22:49:56+5:302020-04-24T00:13:04+5:30
मालेगाव : कोरोना विषाणूशी लढा देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पुरेशा सुविधा उपलब्ध करून द्याव्या, रुग्णालयातील स्वच्छतेवर लक्ष देण्यात यावे. रुग्णांची विशेष काळजी घेण्यात यावी. अशा सूचना देताना आरोग्य सुविधेतील हलगर्जीपणा खपवून घेणार नाही असे निर्देश राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे यांनी आज दिले.

शासकीय विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी इमर्जन्सी आॅपरेशन सेंटरचे प्रमुख डॉ. पंकज आशिया, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) आरती सिंंग, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे, माजी आमदार आसिफ शेख, उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, आयुक्त किशोर बोर्डे, उपायुक्त नितीन कापडणीस, तहसीलदार शिवकुमार आवळकंठे, उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले, मंगेश चव्हाण यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते. रमजान पर्वाच्या अनुषंगाने महापालिका प्रशासनामार्फत केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेताना भुसे म्हणाले, प्रतिबंधित क्षेत्रातील व त्याबाहेरील नागरिकांपर्यंत आवश्यक त्या सुविधा पोहचल्या पाहिजे. भाजीपाला, दुध व फळे यांचे नियोजन करताना महानगरपालिकेमार्फत सुचविलेल्या दहा ठिकाणांपर्यंत वितरणाचे सुयोग्य नियोजन करण्यात यावे, असेही भुसे म्हणाले.