मराठा आंदोलनात सक्रिय भाग घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:15 AM2021-05-18T04:15:23+5:302021-05-18T04:15:23+5:30
आरक्षण हा राज्यातील मराठा समाजाच्या विकासाचा व समाजातील तरुणांच्या भवितव्याचा मुद्दा असून, फडणवीस सरकारने या मुद्द्यावर घटनात्मक कार्यवाही करून ...
आरक्षण हा राज्यातील मराठा समाजाच्या विकासाचा व समाजातील तरुणांच्या भवितव्याचा मुद्दा असून, फडणवीस सरकारने या मुद्द्यावर घटनात्मक कार्यवाही करून दिलेल्या आरक्षणाचा देखील आघाडी सरकारने मुडदा पाडला. त्यामुळे यापुढे आरक्षणासंदर्भात मराठा समाजाच्या नावाने व नेतृत्वात जी आंदोलने होतील, त्यामध्ये भाजप पक्षीय ओळख बाजूला ठेवून सहभागी होईल. आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेपर्यंत हा लढा सुरू ठेवण्याचा भाजपचा निर्धार आहे, असेही हिरे यांनी म्हटले आहे.
मराठा समाजास आरक्षण देण्याची आघाडी सरकारची मानसिकताच नसल्याने आघाडी सरकारने मराठा समाजाची घोर फसवणूक केली आहे, हे सर्वोच्च न्यायालयाचे निकालपत्र वाचल्यावर उघड होते. ठाकरे सरकारने ही फसवणूक थांबवावी व समाजास न्याय मिळावा, यासाठी सरकारला जागे करणे गरजेचे आहे. त्यासाठी होणाऱ्या प्रत्येक राज्यव्यापी आंदोलनात भाजपचा सक्रिय सहभाग राहील, असे ते म्हणाले.