एकलहरे, सामनगावला वादळी वाऱ्याने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 07:30 PM2019-06-12T19:30:13+5:302019-06-12T19:30:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क एकलहरे : परिसरात सलग तिसºया दिवशीही पावसाने वादळी वाºयासह जोरदार हजेरी लावल्याने ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
एकलहरे : परिसरात सलग तिसºया दिवशीही पावसाने वादळी वाºयासह जोरदार हजेरी लावल्याने ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर सिद्धार्थनगर झोपडपट्टीत पिंपळाच्या झाडाची फांदी घरावर कोसळून संपूर्ण घरच उद्ध्वस्त झाले. सिद्धार्थनगर, हनुमाननगर या भागातही घरांवर झाडाच्या फांद्या कोसळून नुकसान झाले. काही ठिकाणी पाणी साचल्याने घरांमध्ये पाणी शिरून नागरिकांचे हाल झाले.
एकलहरे परिसरातील सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, जाखोरी, चांदगिरी, हिंगणवेढे, कालवी पाडळी, लाखलगाव, ओढा, शिलापूर, माडसांगवी, गंगावाडी, सिद्धार्थनगर, एकलहरे वसाहत, एकलहरे गाव या पंचक्रोशीत मंगळवारी वादळी वाºयासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. सायंकाळी साडेपाच ते साडेसहा दरम्यान पूर्वेकडून वादळासह जोरदार मुसंडी मारत पावसाचे आगमन झाले. या दरम्यान सर्व परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. एकलहरे वसाहतीतील भाजी विक्रेते, ग्राहक यांची धावपळ झाली. तर सायंकाळी साडेपाच वाजता आॅफिसमधून सुटणाºया चाकरमान्यांची फजिती झाली. सिद्धार्थनगर, हनुमाननगर परिसरात घरांवर झाडे कोसळून नुकसान झाले. येथील जिजाबाई रमेश गवळी (६०) या घरामध्ये स्वयंपाक करीत असताना वादळामुळे शेजारील पिंपळाच्या झाडाची मोठी फांदी घरावर कोसळल्याने मोठा आवाज झाला. त्या आवाजाने आजूबाजूचे रहिवासी धावून आले व त्यांनी जिजाबाईला बाहेर काढले. घरावर झाड कोसळल्याने संपूर्ण घरच उदध््वस्त झाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. शासनाने नुकसानीचा पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
या जोरदार पावसामुळे सामनगाव, कोटमगाव शिवारातील काही शेतकऱ्यांच्या कांदा चाळींचे पत्रे उडाल्याने त्यांचेही मोठे नुकसान झाले. कोटमगाव येथील शेतकरी दिनकर म्हस्के यांच्या पार्किंगचे शेड, तर काही ठिकाणी विजेचे खांब कोसळून तारा तुटल्याने व झाडाच्या फांद्या कोसळल्याने नुकसान झाले आहे. सामनगावचे तंटामुक्ती अध्यक्ष शिवराम पुंजाजी जगताप यांच्या कांदा चाळीच्या शेडचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्तांच्या भरपाईसाठी पंचनामे करून त्वरित भरपाई मिळावी, अशी मागणी सरपंच बाळासाहेब म्हस्के यांनी केली आहे. या जोरदार पावसामुळे शेतात सर्वत्र पाणी साचले.