एक खिडकी पथक गणेश मंडळांच्या दारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 12:13 AM2019-08-25T00:13:23+5:302019-08-25T00:13:41+5:30

गणेशोत्सव काळात विविध कार्यक्रमांसाठी परवानगी घेणेकामी दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळ कार्यकर्त्यांची होणारी दमछाक टाळण्यासाठी प्रशासनाने गेल्यावर्षी तोडगा काढत एक खिडकी पथक मंडळांच्या दारी योजना सुरू केली असून, त्यानुसार पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आत्तापर्यंत २७ मोठ्या मंडळांच्या ठिकाणी पथकाने भेटी देऊन पाहणी करून सूचना दिल्या आहेत.

 A window passenger Ganesh Mandal door | एक खिडकी पथक गणेश मंडळांच्या दारी

एक खिडकी पथक गणेश मंडळांच्या दारी

Next

पंचवटी : गणेशोत्सव काळात विविध कार्यक्रमांसाठी परवानगी घेणेकामी दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळ कार्यकर्त्यांची होणारी दमछाक टाळण्यासाठी प्रशासनाने गेल्यावर्षी तोडगा काढत एक खिडकी पथक मंडळांच्या दारी योजना सुरू केली असून, त्यानुसार पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आत्तापर्यंत २७ मोठ्या मंडळांच्या ठिकाणी पथकाने भेटी देऊन पाहणी करून सूचना दिल्या आहेत.
एक खिडकी योजनेतील पथकाने गेल्या काही दिवसांपासून परिसरात असलेल्या मंडळांच्या ठिकाणी भेटी देत पाहणी करत सूचना देण्याचे काम सुरू केले आहे. गणेशोत्सवासाठी अटी, शर्ती बघून अंतिम परवानगी पोलीस प्रशासन देणार आहे. स्थानिक पोलीस ठाण्यातील कर्मचारी, शहर वाहतूक शाखा, मनपा बांधकाम, अग्निशामक, वीज वितरण कंपनी अधिकारी, कर्मचारी पथकात सहभागी झाले आहे. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंडप उभारणी परवानगीसाठी मंडळांनी मनपाकडे अर्ज सादर केलेल्या मंडळांचे अर्ज घेऊन पथक दैनंदिन त्या भागात मंडळांच्या भेटी घेत आहेत. मंडप उभारणीसाठी परवानगी घेतलेल्या जागेची तपासणी, रस्त्याचे मोजमाप करणे, वाहतुकीला अडथळा होणार नाही तसेच मंडप उभारणीच्या ठिकाणी धोकादायक वीजतारा आहे का? अग्निशमन दल तसेच रुग्णवाहिका रस्त्याने नेता येतील का याची पाहणी पथकाकडून केली जात आहे. पाहणी झाल्यानंतर काही अडचण येऊ शकता की नाही याबाबत मनपा, वाहतूक शाखा, वीज वितरण कंपनी पोलीस ठाण्यांना ना हरकत दाखला देत आहे.
..तर कारवाई करणार
गणेशोत्सव मंडळ कार्यकर्त्यांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. नियमांचे पालन केले नाही तर संबंधित मंडळांवर गुन्हे
दाखल करण्याची तयारी प्रशासनाने केली असल्याने कारवाईला
सामोरे जावे लागेल. प्रशासनाच्या नियमावलीचे पालन मंडळांना बंधनकारक आहे.
पाहणी दरम्यान नियमांची पायमल्ली होत असल्याचे आढळून आल्याने
काही मंडळांना नियमानुसार मंडप, स्टेज उभारणीच्या सूचना दिल्या आहेत.
स्वतंत्र वीज मीटर लागणार
मंडप उभारणी अर्जात केलेल्या मागणीनुसार रस्त्याच्या २५ टक्के जागेत मंडप उभारणी करता येईल. घरातून वीजमीटर न घेता स्वतंत्र घ्यावे लागेल. मंडपाजवळ कमीत कमी २०० लिटर पाणी साठा, दोन बादल्या वाळू, सहा किलो अग्निप्रतिबंधात्मक सिलिंडर ठेवणे बंधनकारक आहे. पूर्वी गणेशोत्सव मंडळांना परवानगीसाठी कार्यकर्त्यांना मनपा, पोलीस ठाणे, वाहतूक शाखा, वीज कंपनी कार्यालयात खेट्या घालाव्या लागत होत्या.

Web Title:  A window passenger Ganesh Mandal door

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.