मंडळांना परवानग्यांसाठी एक खिडकी : महापौर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 01:07 AM2017-08-17T01:07:13+5:302017-08-17T01:07:18+5:30
नाशिक : महापालिकेच्या वतीने शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची बैठक महापौर रंजना भानसी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी, महापौरांनी गणेश मंडळांना विविध परवानग्यांसाठी मनपात एक खिडकी योजना कार्यान्वित करण्याचे प्रशासनाला आदेशित केले शिवाय, जेथे गरज भासेल तेथे कृत्रिम तलावांची संख्या वाढविण्याचेही निर्देश देत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन मंडळांना केले. दरम्यान, बैठकीत गणेश मंडळांच्या पदाधिकाºयांनी विविध सूचनांचा वर्षाव केला.

मनपाच्या अभिलेख कक्षात झालेल्या बैठकीत शहरातील विविध मंडळांच्या पदाधिकाºयांनी सूचना केल्या. त्यात वीज वितरण कंपनीकडून लवकर अनामत रक्कम परत मिळावी, सदर अनामत रक्कम कमी करावी, मिरवणूक मार्गावरील अडथळा ठरणारे विजेचे खांब काढावेत, रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, निर्माल्य कलश वाढवावे, परवानग्यांसाठी एक खिडकी योजना राबवावी आदी विविध समस्या सोडविण्याची मागणी करण्यात आली. यावेळी महापौर रंजना भानसी यांनी सांगितले, महानगरपालिकेच्या वतीने मिरवणूक मार्गावरील विविध समस्या सोडण्याचा दृष्टीने उपाययोजना करण्यात येईल. मंडळांना परवानग्यांसाठी तत्काळ एक खिडकी योजना कार्यान्वित केली जाईल.
गणेश उत्सव काळात निर्माल्य संकलनासाठी मनपातर्फेजादा निर्माल्य कलश वाढविण्यात येईल. स्वछतेबाबत विशेष काळजी घेतली जाणार असून गोदावरी नदीचे प्रदूषण कमी होण्याची दृष्टीने कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचे आवाहनही महापौरांनी केले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन गोपीनाथ हिवाळे यांनी केले. बैठकीला पदाधिकारी व विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.