भाजप सेनेत असंतोषाचे वारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 11:41 PM2021-02-24T23:41:01+5:302021-02-25T01:36:14+5:30
नाशिक- महापालिकेच्या स्थायी समितीच्या नियुक्तीवरून शिवसेना आणि भाजपात असंतोषाचे वारे पसरू लागले आहे. भाजपने फाटाफूट नको म्हणून केलेली खेळी पक्षात अनेकांना रुचलेली नाही तर शिवसेनेत देखील समितीवर दोनच ज्येष्ठांना दोन वर्षासाठी संधी का दिली म्हणून नाराजीचा सूर आळवला जात आहे.

महापालिकेची स्थायी समिती ही मलईदार समिती असून समितीत एकदा तरी स्थान मिळावे यासाठी नगरसेवक प्रयत्न करीत असतात. मात्र अखेरच्या वर्षी संधी न मिळाल्याने असंतोष उफाळून येत असतोच यंदाही तशीच स्थिती आहे. भाजपाने सदस्य नियुक्त करताना आगामी सभापतिपदाच्या निवडणुकीत दगाफटका होईल असे गृहीत धरून दोन जुन्या पदाधिकाऱ्यांना संधी दिली असली निवडून दिलेलेच फक्त निष्ठावान आहेत काय असा प्रश्न केला जात असून त्यावरून नाराजी व्यक्त केली जात आहे.
काहींनी तर सभापतपी अगोदरच निश्चित करून मग सदस्य निवडण्याची अभिनव प्रथा भाजपात सुरू झाल्याची टीका केली. दुसरीकडे शिवसेनेत देखील असाच प्रकार आहे. ज्यांना काहीच पदे मिळाली नाहीत त्यांना संधी देण्यास कुणाचा विरोध नाही. मात्र समितीत सर्व सदस्यांना एकेक वर्षच संधी असताना पक्षातील दोन ज्येष्ठ नगरसेवकांनाच संधी का असा प्रश्न देखील केला जात आहे. त्यामुळे महापालिकेतील दोन्ही पक्षांना नाराजीचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.