वादळी पावसाने शेतीमालाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 05:25 PM2018-11-06T17:25:05+5:302018-11-06T17:25:34+5:30

 नांदगाव तालुक्यातील साकोरा परिसरात रविवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसाने शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शिवमळा शिवारातील शिमला मिरची सह शेड नेटचे प्रचंड नुकसान झाल्याने संबधित शेतकरी हतबल झाला आहे.

 Windy rain losses | वादळी पावसाने शेतीमालाचे नुकसान

वादळी पावसाने शेतीमालाचे नुकसान

Next

रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता साकोरा परिसरात वारेवादळासह जोरदार पावसाला सुरु वात झाली. त्या पावसाचा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना फटका बसला. शिवमळा शिवारातील गट क्र. १०५२/१ मधील दिलीप साहेबराव बोरसे यांच्या एक एकर शेतीत सन डिसेंबर २०१५ मध्ये शेड नेटची उभारणी केली होती. यावर्षी शिमला मिरची तयार असतांना अचानक रात्री झालेल्या वादळी पावसाने प्रचंड नुकसान झाले . दुसºया दिवशी सकाळी बोरसे शेतात गेले असता नुकसान झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तलाठी कपिल मुत्तेपवार यांनी पंचनामा करून साडेचार लाख रूपयांचे शेड नेटचे तसेच दोन लाख तीस हजार रुपयांच्या शिमला मिरचीचे नुकसान झाल्याची शासकीय दप्तरात नोंद करून घेतली. यावेळी राजेंद्र भामरे, भारत बोरसे, संदिप बोरसे, श्रीधर बोरसे, वसंत बोरसे आदी शेतकरी उपस्थित होते.

Web Title:  Windy rain losses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.