निफाड तालुक्यात वादळी पाऊस
By admin | Published: October 18, 2014 12:22 AM2014-10-18T00:22:45+5:302014-10-18T00:22:59+5:30
निफाड तालुक्यात वादळी पाऊस
निफाड : तालुक्यातील अनेक भागात सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे द्राक्षबागांना तसेच खरीप पिकांना फटका बसला.
तालुक्यातील खडक माळेगाव, उगाव, लासलगाव, नैताळे, थेटाळे, विंचूर, नांदगाव, डोंगरगाव, वनसगाव या द्राक्ष पट्ट्यात सायंकाळी वादळी महागर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने दणका दिला. यामुळे तालुक्यातील द्राक्षबागांना तसेच काढणीस आलेल्या खरिपाच्या पिकांना याचा फटका बसणार आहे. यामुळे द्राक्षबागांच्या कामांना खंड पडणार आहे.
या पावसाने द्राक्षघडांची
कुज होऊन बागांवर डावणीचा प्रादुर्भाव होणार आहे. सदरच्या पावसाने काढणीस आलेल्या खरिपाच्या पिकांना विशेषत: सोयाबीनला फटका बसणार
आहे. मुसळधारेने तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र रब्बीच्या पिकांना दिलासा मिळणार आहे. (वार्ताहर)