‘वाइन कॅपिटल’ बनले ‘कूल सिटी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:14 AM2021-02-10T04:14:53+5:302021-02-10T04:14:53+5:30

शहराचे किमान तापमान रविवारी १० अंशांपर्यंत घसरले होते. यामुळे नागरिकांना हुडहुडी भरली. मंगळवारीसुद्धा पारा घसरल्यामुळे थंडीत अधिकच ...

‘Wine Capital’ becomes ‘Cool City’ | ‘वाइन कॅपिटल’ बनले ‘कूल सिटी’

‘वाइन कॅपिटल’ बनले ‘कूल सिटी’

Next

शहराचे किमान तापमान रविवारी १० अंशांपर्यंत घसरले होते. यामुळे नागरिकांना हुडहुडी भरली. मंगळवारीसुद्धा पारा घसरल्यामुळे थंडीत अधिकच वाढ झाल्याचा अनुभव नाशिककरांना येत आहे. पहाटे थंडीचा कडाका वाढल्याने सकाळी फेरफटका मारणाऱ्यांची संख्याही रोडावल्याचे दिसून आले. पहाटेपासून सूर्योदयापर्यंत शहराने धुक्याची दुलई पांघरलेली होती. त्यामुळे सकाळी नाशिककरांना जणू आपण महाबळेश्वर, कुलुमनाली किंवा माथेरानसारख्या थंड हवेच्या ठिकाणी तर नाही ना, असा प्रश्न पडला होता. सकाळी नाशिककरांनी थंडीपासून बचावासाठी शेकोट्या पेटविल्याचेही दिसून आले. गोदाकाठासह विविध झोपडपट्ट्यांमध्ये शेकोट्यांपासून ऊब घेत थंडीच्या कडाक्यापासून दिलासा मिळविण्याचा प्रयत्न केला. दिवसभर थंड वारे वाहत राहिल्यामुळे वातावरणात गारवा टिकून होता. दिवसभर वातावरणात गारवा राहत असल्यामुळे नाशिककर सकाळपासून रात्रीपर्यंत उबदार कपड्यांचा वापर करताना दिसत आहेत. शनिवारी संध्याकाळपासून नागरिकांना थंडीचा कडाका अनुभवास येत आहे.

पुढील काही दिवस नागरिकांना थंडीच्या तीव्रतेचा सामना करावा लागण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. शहरात दिवसा तसेच रात्रीही आकाश पूर्णत: निरभ्र राहत असल्याने पारा वेगाने घसरत असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

-- इन्फो--महाबळेश्वर १२.४ तर नाशिक ९.१

राज्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये मंगळवारी १२.४ अंश इतके किमान तापमान नोंदले गेले तर नाशिकमध्ये त्यापेक्षाही कमी ९.१ अंश तापमानाची नोंद झाली. सलग मागील आठवडाभरापासून महाबळेश्वरच्या तुलनेत नाशकातील हवामान अधिक थंड राहत असल्याचे हवामान खात्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

-- इन्फो---

मागील वर्षाच्या तुलनेत थंडी कमीच

मागील वर्षी १७ जानेवारी २०२० साली किमान तापमानाचा पारा थेट ६ अंशांपर्यंत खाली घसरला होता. यावर्षी मात्र १० अंशांपेक्षा तापमान अद्याप खाली आलेले नाही. रविवारी या वर्षातील सर्वाधिक नीचांकी तापमानाची नोंद झाली. त्यामुळे यावर्षी गतवर्षाच्या तुलनेत थंडीचा प्रकोप तसा बघितला तर कमीच असल्याचे दिसून येते. हंगामात नववर्षाच्या प्रारंभी २३ डिसेंबर रोजी ८.२ अंशांपर्यंत तापमान घसरले होते, ही सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली होती.

---

फोटो आर वर०९पीएच एफबी ७२/७४ : शहरावर पसरलेली धुक्याची चादर (नीलेश तांबे)

===Photopath===

090221\09nsk_8_09022021_13.jpg~090221\09nsk_9_09022021_13.jpg

===Caption===

नाशिक शहरावर पहाटे पसरलेली धुक्याची चादर~नाशिक शहरावर पहाटे पसरलेली धुक्याची चादर

Web Title: ‘Wine Capital’ becomes ‘Cool City’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.