विंचूर येथे वाईन महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 01:22 PM2018-02-12T13:22:41+5:302018-02-12T13:22:54+5:30
विंचूर : अखिल भारतीय वाईन उत्पादक संघ आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने आयोजित विंचूर येथील दोन दिवसीय वाईन फेस्टिवल अभुतपुर्व उत्साहात संपन्न झाला.
विंचूर : अखिल भारतीय वाईन उत्पादक संघ आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने आयोजित विंचूर येथील दोन दिवसीय वाईन फेस्टिवल अभुतपुर्व उत्साहात संपन्न झाला. वाईन चाहत्यांसाठी पर्वणी असलेला इंडिया ग्रेप हार्वेस्टिंग फेस्टिवलमुळे येथील वाईन पार्क वसाहतीत शनिवार व रविवार दोन दिवसात वाईनप्रेमी सामील झाले. डोंगराच्या कुशीत वसलेल्या विंचूरच्या वाईनरी पार्कमधील रविवारची सायंकाळ दर्जेदार कार्यक्र मांमुळे उजळून निघाली होती. विविध प्रकारचे वाईन लेबल्स, ग्रेप स्टॉम्पिंग, वाईन बाथ, लाईव्ह बँड, पारंपरिक संगीत व डान्स, वाईनसंदर्भात वर्कशॉप, विविध प्रकारच्या खाद्य पदार्थांचा आस्वाद अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. फेस्टिवल साठी आलेल्या वाईनप्रेमींनी ग्रेप स्टाँम्पिंग आणि वाईन बाथचा आनंद घेतला. एमएच १५ बँडने ग्रेप महोत्सवात उपस्थितांना आपल्या तालावर थिरकायला लावले. रविवारी सायंकाळी अभिनेते रणजित आणि ज्युनिअर देवानंद यांनी आपल्या खुमासदार शैलीतील डायलाँग आण िबाँलीवुड मधील किस्यांनी उपस्थितांचे मनोरंजन केले. कार्यक्र मांचा आनंद घेतानाच वाईनप्रेमी वाईन व फूडचाही आस्वाद घेत होते. फेस्टिवलसाठी वाईन प्रेमींसह संगीतप्रेंमीं उपस्थित होते.