तपोवनात वाहनासह मद्यसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 01:22 AM2018-09-14T01:22:18+5:302018-09-14T01:22:46+5:30
तपोवन क्रॉसिंग समोरील रस्त्याने बेकायदा देशी व विदेशी मद्याची वाहतूक करणारी जीप गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने अडविली. गुरुवारी (दि.१३) या संशयित वाहनाची तपासणी केली असता पोलिसांना सुमारे ६० हजार रु पयांच्या ३५० मद्याच्या भरलेल्या बाटल्या आढळून आल्या.
पंचवटी : तपोवन क्रॉसिंग समोरील रस्त्याने बेकायदा देशी व विदेशी मद्याची वाहतूक करणारी जीप गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने अडविली. गुरुवारी (दि.१३) या संशयित वाहनाची तपासणी केली असता पोलिसांना सुमारे ६० हजार रु पयांच्या ३५० मद्याच्या भरलेल्या बाटल्या आढळून आल्या.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तपोवन क्र ॉसिंग येथून देशी-विदेशी मद्यसाठा असलेली जीप (एमएच १५ सी के १२६३) द्वारका रस्त्याने जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सहायक पोलीस आयुक्त बापू बांगर, पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बळीराम पालकर, हवालदार वसंत पांडव, प्रवीण कोकाटे, रवि बागुल आदींनी परिसरात सापळा रचला. संशयित जीप आली असता साध्या वेशातील पोलिसांनी ती रोखण्याचा प्रयत्न केला; मात्र चालकाने वेगाने जीप पुढे दामटविण्यास सुरुवात केल्याने पोलिसांचा संशय बळावला.
तत्काळ पोलीस वाहनातून पाठलाग करत पोलिसांनी अखेर जीप रोखली. यावेळी वाहनाची तपासणी केली असता देशी-विदेशी मद्याच्या विविध कंपन्यांच्या मद्याने भरलेल्या सुमारे साडेतीनशे बाटल्या आढळून आल्या. याबाबत संशियताविरु द्ध गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंंत सुरू होते.