नाशकात वाइन टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 01:34 AM2020-01-15T01:34:19+5:302020-01-15T01:36:02+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नाशिक व अहमदनगर येथील उपकेंद्र सक्षमीकरणासाठी सकारात्मक पाऊल उचलण्याचे आश्वासन देतानाच विद्यापीठ १४ डिसेंबर २०१९ रोजी अधिसभेच्या बैठकीत नाशिकमध्ये वाइन टेक्नॉलॉजीचा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या माध्यमातून उपकेंद्राच्या सबलीकरणासोबतच नाशिकमधील विद्यार्थ्यांना वाइन तंत्रज्ञानातील अत्याधुनिक शिक्षण उपलब्ध होणार असून, येथील वाइन उद्योगालाही कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

Wine Technology Course in Nashik | नाशकात वाइन टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम

नाशकात वाइन टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम

Next
ठळक मुद्देउपकेंद्र सक्षमीकरणाचा प्रयत्न वाइन उद्योगाला मिळणार कुशल मनुष्यबळ

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचेनाशिक व अहमदनगर येथील उपकेंद्र सक्षमीकरणासाठी सकारात्मक पाऊल उचलण्याचे आश्वासन देतानाच विद्यापीठ १४ डिसेंबर २०१९ रोजी अधिसभेच्या बैठकीत नाशिकमध्ये वाइन टेक्नॉलॉजीचा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या माध्यमातून उपकेंद्राच्या सबलीकरणासोबतच नाशिकमधील विद्यार्थ्यांना वाइन तंत्रज्ञानातील अत्याधुनिक शिक्षण उपलब्ध होणार असून, येथील वाइन उद्योगालाही कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
नाशिक जिल्ह्यात गेल्या दशकभरात वाइन उद्योगाचा झपाट्याने विकास झाला असला तरी अजूनही स्थानिक पातळीवर या क्षेत्रातील मागणीनुसार तंत्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. विद्यापीठाने लवकरच नाशिक उपकें द्राच्या माध्यमातून वाइन टेक्नॉलॉजी व जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय कुलगुरूंनी विद्यापीठ अधिसभेच्या बैठकीत घेतल्याची माहिती अधिसभा सदस्य नंदू पवार यांनी दिली.
वाइन टेक्नॉलॉजीच्या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना स्थानिक वाइन उद्योगासोबतच शासकीय क्षेत्रातही करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असून, सरकारचा कृषी विभाग, आयात व निर्यात विभाग यांसह खासगी क्षेत्रातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाइन उत्पादन कंपन्या, विनियार्ड व्यवस्थापन व विपणन सेवा, संशोधन तंत्र, तांत्रिक सहायक, वायनरी प्रयोगशाळा तांत्रिक आदी विविध पदांसह वाइन उद्योगातील गुणवत्ता नियंत्रक म्हणूनही या अभ्यासक्रमाचा विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो. त्याचप्रमाणे स्वत:ची वाइनरी सुरू करणे, वाइनरी सल्लागार वाइन उत्पादक अथवा वाइन परीक्षक म्हणून काम करताना विद्यार्थ्यांना स्वत:चा उद्योग व्यवसायही सुरू करणे शक्य होऊ शकते. त्यामुळे कुलगुरूंनी घोषणा केली असली तरी हा अभ्यासक्रम प्रत्यक्षात कधी सुरू होणार याची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे.
प्रवेशासाठी पात्रता
वाइन टेक्नॉलॉजीच्या पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा जीवशास्त्र विषयासह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे अथवा दहावीनंतर कृषी अथवा फळप्रक्रिया, वाइन टेक्नॉलॉजी, फलोत्पादन अभ्यासक्रमाची पदविका संपादन केलेल्या विद्यार्थांनाच या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळणार आहे. या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना शंभर गुणांची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार असून, बारावी किंवा बारावीच्या समांतर परीक्षेत किमान ५० टक्के गुण संपादन करणे आवश्यक आहे.

Web Title: Wine Technology Course in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.