आडगावच्या सेंट पीटर शाळेला विजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 06:04 PM2020-01-13T18:04:28+5:302020-01-13T18:05:19+5:30
कसबे सुकेणे : नुकत्याच संपन्न झालेल्या राज्यस्तरीय इनडोअर फुटबॉल साखळी स्पर्धेत एकही सामना न गमावता यजमान नाशिकच्या सेंट पिटर इंग्लिश मिडीयम स्कुलच्या संघाने नेत्रदीपक कामिगरी करीत स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. अंतिम सामना निफाड व नाशिक संघात झाला, यात नाशिक विजयी झाले.

इनडोअर फुटबॉल असोसिएशन आडगाव येथील टर्फ मैदान येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत यजमान नाशिकसह बीड, लातूर, धुळे, उदगीर, रायगड, ठाणे, नवी मुंबई, पुणे, सोलापूर येथील संघ सहभागी झाले होते.
१७ वर्षाच्या आतील गटात निफाड व नाशिक यांच्यात अंतिम लढत झाली यात पेनल्टी शूट आऊट मध्ये नाशिकचा पराभव झाला.
स्पर्धेचे उपविजेतेपद पटकाविले. नाशिकच्या संघात सेंट पीटर इंग्लिश स्कूलचे खेळाडू कुणाल सगर, स्वयम जाधव, साहस जाधव, सुरज मते, केशव कैत्वास, कैफ खाटीक ओंकार माळोदे यांचा समावेश होता. १४ वर्षाच्या आतील संघात गौरव जाधव, लकी लहानगे, नैतिक लभडे, दर्शन गायकवाड, पियुष मते, पार्थ दुसाने, ओंकार दिंडे, प्रतीक चिखले यांचा सहभाग होता. १४ वर्षाच्या आतील गटाचे विजेतेपद नाशिकने पटकावले असून स्पर्धेत चमकदार कामिगरी केलेल्या खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेत निवड होऊन ते अमृतसर येथे हे सर्व विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर खेळणार आहेत अशी माहिती प्रशिक्षक सतीश बोरा यांनी दिली. या त्यांच्या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक राजू सोनवणे, पर्यवेक्षक क्लेमंट परेरा यांनी सर्व खेळाडू व प्रशिक्षक सतिश बोरा यांचे अभिनंदन केले.