सिन्नर तालुक्यातील विजयी उमेदवारांना सरपंचपदाच्या आरक्षणाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:15 AM2021-01-25T04:15:47+5:302021-01-25T04:15:47+5:30

नांदूर शिंगोटे : सिन्नर तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर विजयी उमेदवारांसह ग्रामस्थांना सरपंचपदाच्या आरक्षणाची प्रतीक्षा लागली आहे. गुरुवार ...

Winning candidates from Sinnar taluka await reservation for Sarpanch post | सिन्नर तालुक्यातील विजयी उमेदवारांना सरपंचपदाच्या आरक्षणाची प्रतीक्षा

सिन्नर तालुक्यातील विजयी उमेदवारांना सरपंचपदाच्या आरक्षणाची प्रतीक्षा

Next

नांदूर शिंगोटे : सिन्नर तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर विजयी उमेदवारांसह ग्रामस्थांना सरपंचपदाच्या आरक्षणाची प्रतीक्षा लागली आहे. गुरुवार (दि.२८) रोजी तहसील कार्यालयात सरपंचपदाची आरक्षण सोडत काढली जाणार आहे.

निवडणुकीपूर्वी सरपंचपदाचे आरक्षण कार्यक्रम रद्द झाल्याने पॅनलप्रमुखांची चांगलीच पंचाईत झाली होती.

तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींपैकी दहा ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली होती. उर्वरित ९० ग्रामपंचायतीत दि. १५ जानेवारीला मतदान होऊन दि. १८ जानेवारीला मतमोजणी पार पडली. यापूर्वीची सोडत रद्द झाल्याने ग्रामपंचायत सदस्यांची धाकधूक वाढली होती. कोणत्या प्रवर्गाला आरक्षण सुटले, तर आपल्याकडे त्या प्रवर्गाचा सदस्य असावा यासाठी संपूर्ण पॅनलच कसे निवडून येईल यासाठी पॅनलप्रमुखांची कसोटी लागली होती. तालुक्यातील अनेक गावांत चुरशीच्या लढती झाल्या. कुठल्याही परिस्थितीत बहुमत मिळवायचे, या उद्देशाने पॅनलप्रमुखांनी संपूर्ण ताकद लावून निवडणूक लढवली. आता निवडणूक प्रक्रिया पार पडली. मात्र, सरपंचपदाचे कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर होते, याकडे नजरा लागल्या आहेत. सुरुवातीला आरक्षण सोडत रद्द झाल्याचे आदेश निघाल्यानंतर पुन्हा सर्वच जण निवडणुकीच्या आखाड्यात उतरले. पॅनलप्रमुखांनी सर्वच उमेदवार निवडून कसे येतील, याकडे लक्ष दिले. अखेर पाच वर्षांसाठीच्या काळासाठी सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.

इन्फो...

चुरशीच्या झाल्या लढती

सिन्नर तालुक्यात पक्षीय पातळीपेक्षा व्यक्तीकेंद्रित राजकारणाला महत्त्व असल्याने आ. माणिकराव कोकाटे व माजी आ. राजाभाऊ वाजे समर्थक गटातच गावपातळीवर लढती झाल्या. मोठ्या गावांबरोबरच छोट्या ग्रामपंचायतीतही अटीतटीच्या लढती झाल्या. अनेक वर्षे गावाचा कारभार करणार्या गावपुढाऱ्यांना यंदा चांगलाच फटका बसला आहे. विशेष म्हणजे तरुणांनी निवडणुकीत उडी घेऊन प्रस्थापितांना मात देत परिवर्तन घडवून आणले आहे. अनेक गावांत यंदा लक्ष्मी अस्त्राचाही मोठ्या प्रमाणावर वापर झाल्याचे बोलले जात आहे.

इन्फो...

असे असेल आरक्षण

सिन्नर तहसील कार्यालयाने दि. २८ जानेवारी रोजी तालुक्यातील ११४ ग्रामपंचायतींसाठी सरपंचपदाची आरक्षण सोडत व प्रवर्गनिहाय सरपंचपदांची संख्या निश्चित केली आहे.

तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींची निवडणूक नुकतीच पार पडली. ११४ पैकी तब्बल ६३ ग्रामपंचायतींवर सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना सरपंचपदाची संधी मिळणार आहे.

निश्चित केलेल्या आरक्षित सरपंचपदाच्या संख्येनुसार अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी ७, अनुसूचित जमातीसाठी १४, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी ३० गावांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे आपल्या गावांमध्ये यापैकी कुठल्या प्रवर्गाचे आरक्षण निघणार आणि कोणत्या प्रवर्गाला गावाचे सरपंच भूषविण्याची संधी मिळणार याकडे आता इच्छुकांच्या नजरा लागल्या आहेत.

Web Title: Winning candidates from Sinnar taluka await reservation for Sarpanch post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.