विजयी विश्व तिरंगा प्यारा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 10:41 PM2020-01-27T22:41:30+5:302020-01-28T00:29:48+5:30

मालेगाव शहर परिसरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विविध शाळा-महाविद्यालयांसह शासकीय-निमशासकीय कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.

Winning World Triangle Cutie ... | विजयी विश्व तिरंगा प्यारा...

काबरा प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराज व राणी लक्ष्मीबाईची वेशभूषा.

googlenewsNext
ठळक मुद्देमालेगाव : शहर-परिसरातील विविध शाळा-महाविद्यालयांमध्ये घुमले देशभक्तीचे सूर

मालेगाव : शहर परिसरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विविध शाळा-महाविद्यालयांसह शासकीय-निमशासकीय कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.
व्हीबीबीएच विद्यालय कळवाडी
मालेगाव : तालुक्यातील कळवाडी येथील पोलीस आउटपोस्टवर राजपूत यांच्याहस्ते, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेजवळ शाखाधिकारी गावित यांच्याहस्ते, तर ग्रामपंचायतचे नवीन कार्यालयाजवळ सरपंच जयश्री खवळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सेवा सोसायटी कार्यालयात चेअरमन सुदाम देसले यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यालयातील महादेवाचे मंदिराचे पूजन सेवा सोसायटीचे चेअरमन सुदाम देसले यांच्याहस्ते करण्यात आले.
प्राचार्य कमलाकर काकळीज त्यांच्याहस्ते विद्यालयाच्या प्रांगणात तिरंगा ध्वज फडकवण्यात आला. देशभक्तीपर नृत्य सादर करण्यात आले. सूत्रसंचालन के. डी. वाकळे यांनी केले. एस. एन. चव्हाण यांनी आभार मानले.
केबीएच विद्यालय, कॅम्प
मालेगाव : कॅम्पातील केबीएच विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात अध्यक्षस्थानी प्राचार्य अनिल पवार होते. प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष दीपक मालपुरे, उपप्राचार्य सुनील बागुल, पर्यवेक्षक विलास पगार, एस. पी. सावंत, पर्यवेक्षिका एन. एस. शेख, कनिष्ठ विभागाचे इन्चार्ज प्रा. प्रफुल्ल निकम, कार्यालयाचे प्रमुख जे. एस. कन्नोर, योगेश गांगुर्डे, प्रा. अनिकेत वाघ उपस्थित होते. संविधानामधील उद्देशिकेचे वाचन शिक्षिका पुष्पा वाघ यांनी केले. प्राचार्य अनिल पवार यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. क्रीडाशिक्षक जे. टी. ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने लेजीम प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. विविध देशभक्तीपर गीते, नृत्य सादर करण्यात आली. रंगभरण स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना व भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्याना सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन राजेश धनवट यांनी केले. आभार राजेंद्र शेवाळे यांनी मानले.
गो. य. पाटील विद्यालय
जळगाव निंबायती : येथील गोविंदराव यशवंतराव पाटील विद्यालयात संस्थेचे संचालक जगन्नाथ दुकळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्काउट-गाइडचे ध्वजारोहण पर्यवेक्षक एस. पी. दुकळे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष श्रीमती कासूताई पाटील होत्या. समवेत संस्थेचे सचिव महेंद्र पाटील, समन्वयक निंबाजी शिंदे, खजिनदार बाळासाहेब दुकळे, प्राचार्य जी. एस. फसाले, प्राध्यापक कर्मचारी, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी प्रा. अमोल अहिरे यांनी संविधानाचे सामूहिक वाचन घेतले. माजी विद्यार्थी महाराष्ट्र पोलीस दलात कर्तव्य बजावत आहेत. यावेळी त्यांच्या पालकांना सन्मानित करण्यात आले. देशभक्तीपर गीते, विद्यार्थ्यांचे मानवी मनोरे आदी कार्यक्रम सादर करण्यात आले. प्रास्ताविक व्ही. डी. काळे यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. डी. एस. जमधाडे यांनी केले.
सेवा इंग्लिश स्कूल, खाकुर्डी
मालेगाव : तालुक्यातील खाकुर्डी येथील सेवा इंग्लिश स्कूल माध्यमिक विद्यालयात ध्वजारोहण मुख्याध्यापक वाय. डी. निकम यांच्या हस्ते करण्यात आले स्वागत पी. बी. भदाणे, पी. जी. उशिरे यांनी केले. विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांचे हस्ते गौरवण्यात आले. प्रास्ताविक व्ही. व्ही. कांबळे यांनी केले, तर आभार पी. एस. ठाकरे यांनी मानले.
काबरा विद्यालय महाविद्यालय
मालेगाव : येथील राजस्थान शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कै. ल रा. काबरा प्राथमिक, माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात संस्थेचे उपाध्यक्ष नटवरलाल काबरा यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्काउट पथकाने उत्कृष्ट संचलन सादर करीत मानवंदना दिली. बालमंदिरच्या विद्यार्थ्यांची भाषणे झाली. विद्यार्थ्यांनी भारतमाता, निर्मला सीतारामन यांची वेशभूषा सादर केली. प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञा, संविधान, ध्वजगीत, लेजीम, योगा नृत्य आणि देशभक्तीपर नृत्य सादर केले. माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वारकरी, छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, झाशीची राणी, महाराणा प्रताप पंजाबी भांगडा, गरबा, तसेच मद्रासी नृत्य करीत राष्ट्रीय एकात्मतेचे सांस्कृतिक दर्शन घडवणारे जिवंत देखावे सादर केले. माजी विद्यार्थ्यांनी बाळा पवार मित्रमंडळामार्फत विद्यार्थ्यांना बूट व लेखन पॅड वाटप केले.
याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष ओमप्रकाश सारडा, कार्यवाह गोविंदनारायण तोतला, कोषाध्यक्ष अशोक राणासारिया, प्राथमिक शाळा समिती चेअरमन महेंद्र मोदी माध्यमिक शाळा समिती चेअरमन रवीश मारू , जाजू इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन समीर मुंदडा, समन्वयक कल्पेश हेडा, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नितीन हिरे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सुधीर ठाकूर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य राहुल घरटे उपस्थित होत. सूत्रसंचालन अभय पाटील यांनी केले. आभार श्रीमती ए. सी. देवरे यांनी मानले.
आर्मस्टाँग साखर कारखाना
मालेगाव : दाभाडी येथील आर्मस्ट्राँग साखर कारखाना येथे ध्वजारोहण करण्यात आले. कर्मचारी रामचंद्र शेवाळे यांनी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या पुतळ्यास तर रवींद्र निकम यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी मनोज निकम, अरु ण जाधव, सुभाष पवार, रितलाल कचवे, सुभाष निकम, हरिभाऊ जाधव, अशोक मानकर, अशोक निकम, दादाभाऊ निकम, सर्जेराव निकम, भिकन नंदन, जयराम वळवी, दौलत गांगुर्डे आदीसह सुरक्षा जमादार, सुरक्षा अधिकारी, सुरक्षारक्षक उपस्थित होते.
आर बी एच कन्या विद्यालय
मालेगाव : येथील आर. बी. एच. कन्या विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये सकाळी प्रभातफेरी काढण्यात आली. ठिकठिकाणी लेजीम नृत्य घेण्यात आले. सामूहिक संविधानाचे वाचन झाले. प्राचार्य अलका जोंधळे यांनी ध्वजारोहण केले. गाइड व आरएसपीच्या विद्यार्थिनींनी क्रीडाशिक्षक एस बी, शेलार, नितीन गायकवाड व व्ही. एम. यांच्या मार्गदर्शनाखाली संचलन केले. विद्यालयात विविध सांस्कृतिक
कार्यक्र म सादर करण्यात आले. कार्यक्रमाला उपप्राचार्य राजेंद्र पाटील, पर्यवेक्षक प्रमिला पाटील व श्रीमती कीर्ती पवार, शिक्षक पालकचे उपाध्यक्ष चंद्रकांत पटाईत व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागाचे प्रमुख श्रीमती माधवी नेरकर यांनी केले. कविता सोनवणे यांनी आभार मानले.
या. ना. जाधव विद्यालय
मालेगाव : येथील या. ना. जाधव विद्यालयात प्राचार्य एच. एस. वाघ यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्काउट-गाइड ध्वजाचे ध्वजारोहण विद्यालयाच्या शिक्षिका ए. टी. महाजन यांनी केले. क्रीडा स्पर्धेत व शालेय विज्ञान प्रदर्शनात यशस्वी झालेल्या स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली. शिक्षक एस. जे. अहिरे टी. जे. सोनवणे, डब्ल्यू. के. बच्छाव, श्रीमती सी. डी. आहिरे, के. बी. ठोके यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्यामुळे सत्कार करण्यात आला. सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विकास मंडळ यांनी पानिपत ते नाशिक एवढा दीर्घ प्रवास बेटी बचाव हा संदेश देत सायकलवर केला. त्याचा सत्कार संस्थेचे चेअरमन सुनील वडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सेके्र टरी जे. आर. आहिरे, विश्वस्त विश्वनाथ जाधव, वसंतराव पूरकर, अश्वनीकुमार माळी, राजेंद्र आहिरे, पी. डी. महाजन, प्राचार्य एच. एस. वाघ, पर्यवेक्षक के. आर. साळुंखे शिक्षक व शिक्षकेतर उपस्थित होते.
किलबिल इंग्लिश स्कूल
मालेगाव : येथील माउली बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित किलबिल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये उद्योजक रवींद्र दशपुते यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. संस्थेच्या अध्यक्ष वनित पवार, सचिव राजेंद्र पवार, कोषाध्यक्ष अशोक गुप्ता, संचालक वंदना पवार, संगीता गुप्ता, अनिता पवार, मिलिंद पवार, अरुण गायकवाड, राजेंद्र बागडे, विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय पाठक, पर्यवेक्षक श्रीमती उषा चौधरी व वैष्णवी सोनजे उपस्थित होते. सुनीता ताडीस यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मनोगते व्यक्त केली विद्यार्थी-विद्यार्थिनींनी शिवम निकम यांच्या मार्गदर्शनाखाली डंबेल्सचे प्रात्यक्षिक, तर प्रज्ञा अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली लेजीमचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. मुख्य अतिथी रवींद्र दशपुते यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन वैष्णवी सोनज व प्रज्ञा अहिरे यांनी केले.
साधना वाचनालय
संगमेश्वरा : येथील साधना वाचनालयात प्रभाग सभापती राजाराम जाधव यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. वाचनालयाचे अध्यक्ष बी. व्ही. मिस्तरी, अशोक बैरागी, सचिव अशोक पठाडे विलास वाडगे, संचालक किशोर मोरे, एम. जी. गिते अशोक फराटे, विवेक वारुळे, सुधाकर बागुल, गोपाळराव माळी, अशोक कापडे उपस्थित होते. सेक्रेटरी अशोक पठाडे यांनी आभार मानले.
साने गुरुजी प्राथमिक शाळा
मालेगाव : साने गुरुजी प्राथमिक शाळेत झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुमित्रा म्हसदे होत्या. त्यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून दीपक शेवाळे, किरण भदाणे, भय्या म्हसदे उपस्थित होते. यावेळी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षिसे देण्यात आली. किरण भदाणे, मुख्याध्यापक राजभोज यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन श्रीमती पगार यांनी केले. प्रास्तविक श्रीमती पवार यांनी केले, तर आभार श्रीमती हिरे यांनी मानले.
र. वी. शाह विद्यालय
मालेगाव : येथील र. वी. शाह विद्यालयात

Web Title: Winning World Triangle Cutie ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.