साकोरा परिसरात विज, वारेवादळासह बेमोसमी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 05:38 PM2019-04-16T17:38:08+5:302019-04-16T17:39:27+5:30
साकोरा : गेल्या चार दिवसांपासून साकोरा परिसरात प्रचंड उकाडा जाणवत असतांना सोमवारी सायंकाळी अचानक विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे-वादळाला सुरूवात झाली आण िनागरिकांची चांगलीच धावपळ उडाली घरी पोहचताच विज पुरवठा खंडित झाला आण िरात्रभर विजपूरवठा खंडित असल्याने तब्बल चार गावातील नागरिकांच्या झोपेचं खोबरं झाल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
साकोरा : गेल्या चार दिवसांपासून साकोरा परिसरात प्रचंड उकाडा जाणवत असतांना सोमवारी सायंकाळी अचानक विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे-वादळाला सुरूवात झाली आण िनागरिकांची चांगलीच धावपळ उडाली घरी पोहचताच विज पुरवठा खंडित झाला आण िरात्रभर विजपूरवठा खंडित असल्याने तब्बल चार गावातील नागरिकांच्या झोपेचं खोबरं झाल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नांदगाव तालुक्याला कायमचा दुष्काळ पुजलेला असतांना पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वनवन भटकंतीची वेळ आली असतांना चार दिवसांपासून प्रचंड उकाड्याने ञस्त नागरिकांना काल सायंकाळी विजांच्या कडकडाटासह धुळीचे लोट पाहून पावसाळ्याची चाहूल झाल्यागत झाले होते. साकोरा, वेहळगांव, पांझण, जामदरी, कळमदरी, बाभुळवाडी, डाक्टरवाडी आदि गावात वादळाने चांगलाच धुमाकूळ घातल्याने जनावरांसाठी विकत घेतलेला चारा झाकण्यासाठी शेतकर्यांची चांगलीच धावपळ उडाली. साकोरा, वेहळगांव, पांझण आण िबाभुळवाडी गावांना पिंपरखेड 132 के. व्ही स्टेशनवरून विजपूरवठा जोडला आहे. त्यात वेहळगांव आण िसाकोरा येथे उपसप्टेशन असून त्यावर पांझण वाटरसप्लायचा पुरवठा जोडला आहे. मात्र सोमवारी सायंकाळी झालेल्या जोरदार वादळामुळे एखाद्या झाडावर फांदी पडल्याने तब्बल एकोणीस तास विजपूरवठा खंडित झाला होता. त्यामुळे विरल चारही गावातील नागरिकांना रात्रभर अंधारात बसावे लागल्याने झोपेचं खोबरं झाल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
तसेच गिरणाडॅम धरणाच्या पाण्यावर आधारीत शेतजमिनीतील काढलेला हजारो क्विंटल कांदा भिजला. दुष्काळ आण ि त्यात बेमोसमी पावसाने हजारो रु पयाचा विकत घेतलेला चारा व कांदा, सोयाबीन कुटी, गवताच्या गाठी, मक्याची कुटी तसेच केळीचे खांब, हजारो रु पये खर्च करून घेतलेला चारा अचानक आलेल्या बेमोसमी पाऊसमुळे झाकायला कोणतेही साधन नसल्यामुळे भिजले.
गिरणाडॅम परिसरातील आमोदे, बोराळे, मळगाव, कळमदरी, परिसरातील हजारो क्विंटल उन्हाळ कांदा काढून पोहळ घातलेल्या होत्या. अचानक आलेल्या या बेमोसमी पावसामुळे पूर्ण कांदा ओला झाला. काढणीला आलेला कांदा सुद्धा या पावसामुळे खराब होण्याची भीती शेतकर्याला आता वाटू लागली आहे.
आठ एकरचा अंदाजे १५०० क्विंटल काढलेल्या कांद्याच्या ३० पोअळा शेतात पडलेला होता. दोन दिवसात चाळीत भरणार होतो. परंतु अचानक आलेल्या बेमोसमी पाऊस व जोराच्या हवेमुळे कांदा झाकता आला नाही. झाकायला गेल्यावर ताडपत्र्या दूरवर उडत होत्या. विजेच्या कडकडाटामुळे जीव सांभाळावा का शेतात पिकलेला कांदा सांभाळावा, अशी वेळ आमच्यावर आली होती. त्यामध्ये पूर्ण कांदा भिजला आहे.
- भिलासाहेब राजपूत (शेतकरी)
बोराळे, ता. नांदगाव.
गेल्या कित्येक वर्षांपासून केळीचे उत्पन्न घेत असून यावेळी आलेल्या अवकाळी वादळासह पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे.
- दादाभाऊ सोळूंके. (शेतकरी)
बोराळे, ता. नांदगाव.