वीजबिल वसुलीवरून वायरमनला केली बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 06:01 PM2018-09-26T18:01:56+5:302018-09-26T18:02:14+5:30
सटाणा : वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला शेतकरीपुत्राने मारहाण करून दमबाजी केल्याची घटना बागलाण तालुक्यातील खमताणे शिवारात घडली. महावितरणच्या सटाणा विभागाचे वरिष्ठ तंत्रज्ञ भास्कर खैरनार यांनी याबाबत सटाणा पोलिसांत फिर्याद दिली असून पोलिसांनी सागर जाधव याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
सटाणा : वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला शेतकरीपुत्राने मारहाण करून दमबाजी केल्याची घटना बागलाण तालुक्यातील खमताणे शिवारात घडली. महावितरणच्या सटाणा विभागाचे वरिष्ठ तंत्रज्ञ भास्कर खैरनार यांनी याबाबत सटाणा पोलिसांत फिर्याद दिली असून पोलिसांनी सागर जाधव याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
दरम्यान या घटनेमुळे आक्रमक झालेल्या महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बागलाणच्या तहसीलदारांना निवेदन दिले असून संबधितावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. बुधवारी (दि.२६) सकाळी सात वाजता महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ भास्कर खैरनार हे मदतनीस रवींद्र पवार यांना सोबत घेवून खमताणे शिवारात थकीत वीजबिल वसुलीसाठी निघाले होते. रोहिदास जाधव यांच्या शेताजवळ दोन्ही कर्मचारी आले असता तेथे उभा असलेला सागर वसंत जाधव (रा.मुंजवाड) याने तुम्ही आमचा ट्रान्सफार्मर का बंद केला. म्हणून वाद घातला असता भास्कर खैरनार यांनी खमताणे शिवारातील ट्रान्सफार्मर क्र मांक चार वरील शेतकºयांकडे थकीत वीजबिल असल्याने वरिष्ठ अधिकारी कल्याणी भोये यांच्या आदेशावरून आम्ही वीजपुरवठा खंडित केल्याचे सांगितले. तुमच्या वडिलांच्या नावे असलेले ३७ हजार ७६० रु पयांचे वीजबिल भरणा करा, लगेच तुमचा विद्युत पुरवठा सुरु करतो असे सांजितल्याने, त्याचा राग आल्याने सागर जाधव याने भास्कर खैरनार यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. जर तू आमचा ट्रान्सफार्मर चालु केली नाही तर तुझा बेत पाहतो असा दम देखील संशयिताने दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
आपल्या कर्मचाºयाला मारहाण झाल्याचे कळताच महावितरणचे कार्यकारी अभियंता अनिल उईके, अतिरिक्त कार्यकारी अभियंता आर टी पवार, उपअभियंता अभिजित आहिरे, सहाय्यक उपअभियंता कल्याणी भोये, टी. बी. कापसे, कनिष्ठ अभियंता अजिंक्य जोशी, सहाय्यक अभियंता भाऊलाल नागरे यांच्यासह महावितरणच्या सर्व युनियन व संयुक्त कृती समितीचे कर्मचाºयांनी बागलाणचे तहसीलदार प्रमोद हिले यांची भेट घेवून सबंधित मारहाण करणाºया युवकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून अशा प्रकारांवर अंकुश लावण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात लेखी निवेदन दिले आहे.