वीजबिल वसुलीवरून वायरमनला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 06:31 PM2018-09-27T18:31:25+5:302018-09-27T18:31:45+5:30

वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला शेतकºयाने मारहाण करून दमबाजी केल्याची घटना बागलाण तालुक्यातील खमताणे शिवारात घडली. महावितरणच्या सटाणा विभागाचे वरिष्ठ तंत्रज्ञ भास्कर अर्जुन खैरनार यांनी याबाबत सटाणा पोलिसांत फिर्याद दिली असून, पोलिसांनी सागर वसंत जाधव याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

Wireman hit by electricity bill recovery | वीजबिल वसुलीवरून वायरमनला मारहाण

वीजबिल वसुलीवरून वायरमनला मारहाण

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यास अटक : खमताणे येथील घटना

सटाणा : वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला शेतकºयाने मारहाण करून दमबाजी केल्याची घटना बागलाण तालुक्यातील खमताणे शिवारात घडली. महावितरणच्या सटाणा विभागाचे वरिष्ठ तंत्रज्ञ भास्कर अर्जुन खैरनार यांनी याबाबत सटाणा पोलिसांत फिर्याद दिली असून, पोलिसांनी सागर वसंत जाधव याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
दरम्यान, या घटनेमुळे आक्र मक झालेल्या महावितरणच्या अधिकारी व कर्मचाºयांनी बागलाणच्या तहसीलदारांना निवेदन दिले असून, संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. बुधवारी (दि.२६) सकाळी सात वाजता महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ भास्कर खैरनार हे मदतनीस रवींद्र पवार यांना सोबत घेऊन खमताणे शिवारात थकीत वीजबिल वसुलीसाठी निघाले होते. रोहिदास जाधव यांच्या शेताजवळ दोन्ही कर्मचारी आले असता तेथे उभा असलेला सागर वसंत जाधव (रा. मुंजवाड) याने तुम्ही आमचा ट्रान्सफॉर्मर का बंद केला, म्हणून वाद घातला असता भास्कर खैरनार यांनी खमताणे शिवारातील ट्रान्सफॉर्मर
क्र मांक चारवरील शेतकºयांकडे थकीत वीजबिल असल्याने वरिष्ठ अधिकारी कल्याणी भोये यांच्या आदेशावरून आम्ही वीजपुरवठा खंडित केल्याचे सांगितले.
तुमच्या वडिलांच्या नावे असलेले ३७ हजार ७६० रु पयांचे वीजबिल भरा, लगेच तुमचा वीजपुरवठा सुरू करतो. याचा राग आल्याने सागर जाधव याने भास्कर खैरनार यांना शिवीगाळ करीत मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
तहसिलदाराना निवेदन
आपल्या कर्मचाºयाला मारहाण झाल्याचे कळताच महावितरणचे कार्यकारी अभियंता अनिल उईके, अतिरिक्त कार्यकारी अभियंता आर.टी. पवार, उपअभियंता अभिजित आहिरे, सहायक उपअभियंता कल्याणी भोये, टी.बी. कापसे, कनिष्ठ अभियंता अजिंक्य जोशी, सहायक अभियंता भाऊलाल नागरे यांच्यासह महावितरणच्या सर्व युनियन व संयुक्त कृती समितीच्या कर्मचाºयांनी बागलाणचे तहसीलदार प्रमोद हिले यांची भेट घेऊन संबंधित मारहाण करणाºया युवकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून, अशा प्रकारांवर अंकुश लावण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात लेखी निवेदन दिले आहे.

Web Title: Wireman hit by electricity bill recovery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.