प्रज्ञावंतांना गौरवानंतर उभारी मिळते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:19 AM2021-09-08T04:19:01+5:302021-09-08T04:19:01+5:30
नामूपर येथे श्रीहरी शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक प्रतिष्ठानतर्फे शिक्षक दिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी खांडवी बोलत होते. अध्यक्षस्थानी दगडू ...
नामूपर येथे श्रीहरी शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक प्रतिष्ठानतर्फे शिक्षक दिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी खांडवी बोलत होते. अध्यक्षस्थानी दगडू भटू राणे, तर प्रमुख पाहुणे म्हणून बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील होते.
लाडशाखीय वाणी समाजाला ओबीसी आरक्षण मिळविण्यात सिंहाचा वाटा असलेले सुनील नेरकर यांच्या प्रतिकृतीची रांगोळी काढणाऱ्या दिगंबर अहिरे यांच्या कलाकृतीचे सभागृहाने कौतुक केले. पोलीस अधीक्षक खांडवी यांनी नामपूरचे त्यांचे गुरू भगवान कापडणीस यांचा शिक्षकदिनी सभागृहात पदस्पर्श करून कृतज्ञता व्यक्त केली.
विविध क्षेत्रांतील गुणवंतांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद नेरकर व स्नेहलता नेरकर यांनी दिली. याप्रसंगी भाऊसाहेब अहिरे, दिनेश वाणी, विठ्ठल मगजी, प्रभुदेवा सोनवणे, पोपट भामरे, प्रकाश अहिरे, हेमंत बागूल, भगवान अहिरे आदींची उपस्थिती होती.
इन्फो...
यांचा केला सन्मान...
दीपक पाटकर (प्राथमिक शिक्षक, धुळे), विलास सावंत (माध्यमिक शिक्षक, पिंपळगाव), विजय विखरणकर (मुंबई), किशोर येवले (विमा प्रतिनिधी, चाळीसगाव), किशोर वाघ (प्राथमिक शिक्षक, टेंभे), सोमनाथ नेरकर (उपशिक्षक, उन्नती विद्यालय तळेगाव), दिलीप कोठावदे (पत्रकार, नाशिक), प्रभाकर पाटील (प्राथमिक शिक्षक, नामपूर), मनोज पाटील (प्राथमिक शिक्षक, निजामपूर), दिगंबर अहिरे (कलाशिक्षक, मुंजवाड), भाऊराव काळे (सहायक पोलीस उपनिरीक्षक, जायखेडा), विनोद शिरापुरी (मुंबई पोलीस), दिनेश कापडणीस (ग्रामसेवक, टेंभे), डाॅ. पी.जी. पिंगळे (सेवाभावी आरोग्यदूत कासोदा), विशेष पुरस्कारार्थी : आशा मुसळे (अध्यक्ष, नवहितगुज महिला मंडळ, नाशिक), सतीश अलई (अध्यक्ष, लायन्स क्लब ऑफ नाशिक), धनराज वाणी (सरचिटणीस, नाशिक जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ, नाशिक)
फोटो - ०७ नामपूर १
नामपूर येथे श्रीहरी प्रतिष्ठानच्या वतीने सन्मानित करण्यात आलेले विविध क्षेत्रांतील गुणवंत. समवेत अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी, तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील आदी.
070921\07nsk_34_07092021_13.jpg
नामपूर येथे श्रीहरी प्रतिष्ठानच्या वतीने सन्मानित करण्यात आलेले विविध क्षेत्रातील गुणवंत. समवेत अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी, तहसिलदार जितेंद्र इंगळे पाटील आदी.