दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून माकपाच्या जे पी गावित यांची माघार, महाविकास आघाडीला मोठा दिलासा
By संजय पाठक | Published: May 5, 2024 04:34 PM2024-05-05T16:34:38+5:302024-05-05T16:35:43+5:30
पक्षाने भूमिका बदलून हा निर्णय घेतला आहे.
संजय पाठक, नाशिक: दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी समवेत मैत्रीपूर्ण निवडणूक लढवण्याची घोषणा करणाऱ्या माकपाने आपली उमेदवारी मागे घेतली आहे. या मतदार संघातून माजी आमदार जे पी तथा जीवा पांडू गावित यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता मात्र आज पक्षाने भूमिका बदलून हा निर्णय घेतला आहे.
संपूर्ण राज्यात माकपने केवळ दिंडोरी लोकसभा मतदार संघ सोडविण्याची मागणी केली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांनी कोणत्याही प्रकारे चर्चा न करता परस्पर दिंडोरीतून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे गटाच्या वतीने भास्कर भगरे यांना उमेदवारी घोषित केली. त्यामुळे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आपल्याला विश्वासात न घेता अशा प्रकारची घोषणा करणे हे महाविकास आघाडीच्या घटक असतानाही आपल्या दृष्टीने योग्य नाही अशी त्यांची भूमिका होती राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मध्यंतरी ओझर येथे जीवा पांडू गावित व डॉ डी एल कराड यांच्याशी चर्चा केली होती
मात्र त्यांनी भास्कर भगरे यांनी उमेदवारी मागे घ्यावी अन्यथा मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार राहावे असे स्पष्ट केले होते मात्र गावीत यांच्या बंडखोरीचा फायदा महायुतीला होऊ शकतो आणि भाजपाला पराभूत करणे हेच महाविकास आघाडी आणि माकप सारख्या समविचारी पक्षांचे उद्दिष्ट असल्यामुळे गावीत त्यांची उमेदवारी मागे घेत असल्याचे पक्षाचे सचिव उदय नारकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकार द्वारे कळवले आहे