२२ दिवसांत जिल्ह्यात ४३ टक्के वृक्षलागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 01:03 AM2019-07-23T01:03:30+5:302019-07-23T01:04:03+5:30
राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड अभियानांतर्गत जिल्ह्याला १ कोटी ९२ लाख ३० हजार रोपे लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी १ कोटी २७ लाख ३४ हजार रोपे वनविभागाला लागवड करावयाची आहे.
नाशिक : राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड अभियानांतर्गत जिल्ह्याला १ कोटी ९२ लाख ३० हजार रोपे लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी १ कोटी २७ लाख ३४ हजार रोपे वनविभागाला लागवड करावयाची आहे. त्यापैकी ६० टक्के लागवड वनविभागाने पूर्ण केली, तर एकूण सरासरी ४३ टक्के लागवड जिल्ह्यात यशस्वीपणे करण्यात आली आहे.
पावसाने अचानकपणे दडी मारल्यामुळे जिल्ह्यातील पश्चिम विभागाच्या हद्दीतील तालुक्यांमध्ये वृक्षलागवडीला खोळंबा निर्माण झाला आहे. पावसाच्या उघडीपीमुळे ग्रामपंचायतींनीदेखील वृक्षारोपण थांबविले असून, जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना केवळ १५ टक्क्यांपर्यंत वृक्षलागवडीचे उद्दिष्ट २२ दिवसांत गाठणे शक्य झाले.
जुलै ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात वनविभाग, सामाजिक वनीकरण, वनविकास महामंडळ, ग्रामपंचायतींसह अन्य सरकारी व निमसरकारी संस्था मिळून १ कोटी ९२ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करावयाचे आहे. त्यापैकी ८८ लाख १९ हजार ७३६ रोपांची लागवड पूर्ण करण्यास वनविभागासह अन्य यंत्रणांना यश आले आहे.
सामाजिक वनीकरणाने ६० टक्के, वनविकास महामंडळाने ४५ टक्के, तर ग्रामपंचायतीने १५ आणि अन्य यंत्रणांपैकी आरटीओने ५०, गृहखात्याने ५४, महापालिकेने २४ टक्के इतकी वृक्षलागवड केली आहे. क्रीडा विभाग अन्य यंत्रणांमध्ये आघाडीवर असून, उद्दिष्टाच्या
९७ टक्क्यांपर्यंत लागवड पूर्ण केली आहे. अशी माहिती, सहायक सरंक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली़
अभियानावर आॅनलाइन नियंत्रण
३३ क ोटी रोपे लागवडीची मोहीम आॅनलाइन नियंत्रित केली जात आहे. यासाठी प्रत्येक जिल्हानिहाय ‘डेडिकेटेड सेल’ स्थापन करण्यात आला आहे. तसेच मोहीम अधिकाधिक पारदर्शीपणे राबविण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्हानिहाय लावलेली रोपे, खड्ड्यांची संख्या, तयार रोपांची संख्या आदी माहिती संकलित केली जात असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
वन मंत्रालयाने ५० कोटी वृक्षलागवडीचा अखेरचा ३३ कोटी वृक्षारोपणाचा टप्पा यावर्षी राबविला.
येत्या सप्टेंबर महिन्यात राज्यभरात एकूण ३३ कोटी रोपांची लागवड करण्याचे ‘टार्गेट’ पूर्ण केले
जाणार आहे.
४राज्यात वृक्षाच्छादनाचे क्षेत्र वाढवून पर्यावरणाचा समतोल व निसर्गसंवर्धनासाठी मंत्रालयाकडून हे अभियान राबविले जात आहे. रोपांच्या जगण्याचे
प्रमाण येत्या आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात मोजले जाणार आहे.
पावसावर
अभियानाचे यश
४शहरासह जिल्ह्यात पर्जन्यमानाची स्थिती बिकट झाली असून, वृक्षारोपण अभियानाचे यश पावसाच्या प्रमाणावर अवलंबून आहे. कारण जिल्ह्यातील काही मोजकेच तालुक्यांत अद्याप चांगला पाऊस झाला आहे.
४जुलै ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात वनविभाग, सामाजिक वनीकरण, वनविकास महामंडळ, ग्रामपंचायतींसह अन्य सरकारी व निमसरकारी संस्था मिळून १ कोटी ९२ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करावयाचे आहे.