१४ तास चार भिंतीच्या आत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 11:55 PM2020-03-21T23:55:17+5:302020-03-21T23:56:43+5:30

नाशिक : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार रविवारी (दि. २२) देशभर जनता कर्फ्यू पाळला जाणार असल्याने जिल्ह्यातील सर्व व्यवहार सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत १४ तास थांबणार आहेत. या जनता कर्फ्यूमध्ये पोलिसांकडून कोणत्याही बळाचा वापर केला जाणार नाही; परंतु कोरोनाचा प्रसार रोखण्याकरिता स्वत:बरोबरच दुसऱ्यांनाही जपण्यासाठी स्वयंस्फूर्तीने नागरिकांना १४ तासांसाठी कोंडून घ्यावे लागणार आहे. दरम्यान, जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी केली होती तर आपल्या गावाकडे परतण्यासाठी परप्रांतीयांनी रेल्वेस्थानकांचा परिसर फुलून गेलेला होता.

Within 4 hours four walls! | १४ तास चार भिंतीच्या आत !

चिमुकल्यांनाही जाण कोरोनाची... कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येवला शहरात चिमुकल्यांकडून तोंडाला रुमाल बांधून ढोल बडवित गल्लोगल्ली करण्यात आलेली जनजागृती.

Next
ठळक मुद्देआज जनता कर्फ्यू : स्वत:बरोबरच दुसऱ्यांनाही जपा, कोरोना हटवा

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार रविवारी (दि. २२) देशभर जनता कर्फ्यू पाळला जाणार असल्याने जिल्ह्यातील सर्व व्यवहार सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत १४ तास थांबणार आहेत. या जनता कर्फ्यूमध्ये पोलिसांकडून कोणत्याही बळाचा वापर केला जाणार नाही; परंतु कोरोनाचा प्रसार रोखण्याकरिता स्वत:बरोबरच दुसऱ्यांनाही जपण्यासाठी स्वयंस्फूर्तीने नागरिकांना १४ तासांसाठी कोंडून घ्यावे लागणार आहे. दरम्यान, जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी केली होती तर आपल्या गावाकडे परतण्यासाठी परप्रांतीयांनी रेल्वेस्थानकांचा परिसर फुलून गेलेला होता.
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभर दहशतीचे वातावरण असताना भारतात त्याला प्रतिबंध करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सार्वजनिक ठिकाणी लोकांनी एकत्र जमू नये यासाठी विविध उपाययोजनांबरोबरच बंदी आदेशही लागू करण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर रविवारी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे रविवारी (दि. २२) शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांना १४ तास घराच्या चार भिंतीतच व्यतित करावे लागणार आहेत. जनता कर्फ्यूमुळे जिल्ह्यातील सर्व व्यवहार थंडावणार आहेत.देश आणि माणूस वाचविण्यासाठीच... एरव्ही कर्फ्यू हा शब्द ऐकला की, संचारबंदीसह पोलिसांकडून मिळणाºया दंडुक्यांचा मार याचे स्मरण होते. परंतु, रविवारी पाळण्यात येणाºया जनता कर्फ्यूत पोलिसी बळाचा वापर होणार नाही, की कुठेही संचारबंदी लागू केली जाणार नाही. जनतेने आपला स्वत:चा जीव जपण्याबरोबरच इतरांनाही सुरक्षित ठेवण्यासाठी स्वत:च्या विवेकबुद्धीने पाळलेले आत्मसंयम आहे. या कर्फ्यूमुळे माणूस आणि पर्यायाने देश वाचणार असल्यासंबंधी जागृती केली जात आहे. त्यासाठी काही स्वयंसेवी संस्थाही पुढे सरसावल्या आहेत. परप्रांतीयांची धावपळ : कोरोनामुळे देशभर सर्वत्र प्रतिबंधात्मक उपाय योजले जात आहेत. शहर व जिल्ह्यात सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे उत्तर भारतातून मोठ्या प्रमाणावर रोजगारासाठी स्थलांतरित झालेल्या परप्रांतीयांच्या हाताला काम उरलेले नाही. त्यामुळे परप्रांतीयांनी आपल्या गावाची वाट धरली असून, जिल्ह्यातील नाशिकरोडसह मनमाड, लासलगाव, इगतपुरी, देवळाली कॅम्प या रेल्वेस्थानकांवर गर्दी दिसून आली. जीवनावश्यक वस्तूवगळता अन्य सर्व बाजारपेठांना कुलूप लागणार असून, रस्त्यावरील रहदारीलाही ब्रेक लागणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बव्हंशी आस्थापना, व्यापारी संघटनांनी शनिवारी व रविवारी आपले व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. त्यामुळे शनिवारीच जिल्ह्यात ठिकठिकाणी बाजारपेठांमध्ये शुकशुकाट बघायला मिळाला. मात्र, जनता कर्फ्यूमुळे रविवारी बाजारपेठा बंद राहाणार आहेत. अफवांमुळे नागरिकांनी शनिवारी भाजीपाल्यासह जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मार्केटमध्ये गर्दी केली होती. जनता कर्फ्यू हा कोणीही लादलेला कर्फ्यू नसून जनतेने जनतेच्याच सुरक्षिततेसाठी केलेला एक प्रयोग असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता १४ तास घरांमध्येच थांबून कोरोनाला थोपविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Web Title: Within 4 hours four walls!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.