भगूरची पोलीस चौकी महिन्यातून पंधरा दिवस बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 12:38 AM2018-07-10T00:38:54+5:302018-07-10T00:39:12+5:30
देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याअंतर्गत असलेली भगूर पोलीस चौकी महिन्यातून पंधरा दिवस बंद राहत असून, ती कायमस्वरूपी २४ तास उघडी ठेवून सर्व प्रकारच्या तक्रारींची दखल घ्यावी, अशी मागणी भगूर, राहुरी, दोनवाडे, लहवित, वंजारवाडी, शेणीत येथील ग्रामस्थांनी केली आहे.
भगूर : देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याअंतर्गत असलेली भगूर पोलीस चौकी महिन्यातून पंधरा दिवस बंद राहत असून, ती कायमस्वरूपी २४ तास उघडी ठेवून सर्व प्रकारच्या तक्रारींची दखल घ्यावी, अशी मागणी भगूर, राहुरी, दोनवाडे, लहवित, वंजारवाडी, शेणीत येथील ग्रामस्थांनी केली आहे. १६ वर्षांपूर्वी भगूर परिसरासाठी देवळाली पोलीस ठाण्यांतर्गत पोलीस औटपोस्ट होते. ते २४ तास उघडे राहून त्यासाठी एक पोलीस उपनिरीक्षक, एक हवालदार व तीन पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली होती. तक्रार नोंदणीसाठी स्वतंत्र स्टेशनडायरी ठेवण्यात आली होती. या तक्रारी नोंदवून पुढील कारवाईसाठी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात वर्ग केली जात होती किंवा तक्रारीचे स्वरूप पाहून औटपोस्टमध्येच त्याचे निराकरण करण्यात येत होते. मात्र २४ तास पोलिसांकडून भगूर व परिसरात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवली जात होती. या औटपोस्टमध्ये भगूरसह राहुरी, दोनवाडे, वडगाव पिंगळा, नानेगाव, लहवित, वंजारवाडी या गावांचा समावेश होता. नाशिक पोलीस आयुक्तालयाची निर्मितीनंतर भगूर औटपोस्ट बंद करण्यात येऊन भगूर पोलीस चौकी स्थापन झाली व तक्रार स्टेशन डायरी बंद होऊन भगूरसह परिसरातील नागरिकांना तक्रारी व अर्जफाटे देण्यासाठी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात जाण्याची वेळ आली. भगूर शहरात १५ ते २० हजार लोकवस्ती असून, अनेक खेड्ड्यातील नागरिकांचे मुख्य बाजारपेठ दळणवळण संपर्क ठिकाण आहे येथे देवळाली कॅम्प ठाणेअंतर्गत भगूर पोलीस चौकी आहे ती महिन्यात साधारण १५ दिवस फक्त ३ ते ४ तास उघडी राहते. परिणामी भगूरसह पोलीस ठाण्याअंतर्गत गावातील गोरगरीब नागरिकांना बस, रिक्षा, टॅक्सीचा खर्च करून ५ ते ६ किलोमीटर देवळाली कॅम्पला जावे लागते. त्यामुळे भगूर पोलीस चौकी कायमस्वरूपी उघडी ठेवून येथेच तक्रारीची दखल घ्यावी आणि गंभीर गुन्हाची कारवाई देवळाली पोलीस ठाण्यात वर्ग करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
भगूर पोलीस चौकी बंद राहत असल्याने परिसरात चोºयांचे प्रकार वाढले आहे तरी भगूरला स्वतंत्र पोलीस ठाणे करावे यासाठी मी मागील वर्षी निवेदन दिले तरीही दखल घेतली नाही, निदान पोलीस चौकी तरी नेहमी उघडी ठेवून नागरिकांच्या तक्रारी येथेच सोडवाव्या. - प्रेरणा बलकवडे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी महिला काँग्रेस
काही महिन्यांपूर्वी मी कार्यकर्त्यांसह पोलीस अधिकाºयांना भेटून भगूर पोलीस चौकी कायम बंद राहत असल्याबाबत तक्रार केली. तेव्हा भगुरात एक सहायक पोलीस निरीक्षक, हवालदार, पोलीस कर्मचाºयांची नेमणूक करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. पण ते पाळले गेले नाही. -मोहन करंजकर, नगरसेवक