पूर्व सूचनेशिवाय ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित ; महावितरणची मुजोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 09:17 PM2020-03-03T21:17:55+5:302020-03-03T21:19:32+5:30
शहरात गत महिन्यातच झालेल्या महाराष्ट्र विद्युत नियमाक आयोगाच्या सुनावणीत ग्राहकांनी महावितरणच्या गैरकाराभाराचा विरोधात तक्रारींचा पाढा वाचला असता विभागाच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याचे आश्वासन महावितरणकडून देण्यात आले. परंतु शहरातील विविध भागांत अजूनही ग्राहकांना समाधानकारक सेवा देण्यात महावितरणला अपयश आले आहे.
नाशिक : शहातील विविध भागांत महावितरणच्या वसुली विभागाकडून थकबाकीदार ग्राहकांचावीजपुरवठा खंडित करण्याचे काम वेगात सुरू आहे. परंतु अशाप्रकारे वीजपुरवठा खंडित करताना वसुली विभागाकडून कोणत्याही नियमांचे पालन होत नसल्याचे समोर आले आहे. ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित करताना त्याला पूर्वसूचना देणे बंधनकारक असताना वसुली विभागाकडून अशाप्रकारे कोणतीही पूर्वसूचना दिली जात नसल्याने ग्राहक व वसुली विभागाचे अधिकारी यांच्यात खटके उडण्याचे प्रकार घडत आहेत.
शहरात गत महिन्यातच झालेल्या महाराष्ट्र विद्युत नियमाक आयोगाच्या सुनावणीत ग्राहकांनी महावितरणच्या गैरकाराभाराचा विरोधात तक्रारींचा पाढा वाचला असता विभागाच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याचे आश्वासन महावितरणकडून देण्यात आले. परंतु शहरातील विविध भागांत अजूनही ग्राहकांना समाधानकारक सेवा देण्यात महावितरणला अपयश आले आहे. महावितरणकडे वारंवार ग्रीन बिलांसाठी मागणी करूनही ग्राहकांना वीज बिलाची डिजिटल प्रत मिळत नाही. शिवाय छापील बिलही वेळेत मिळत नसल्याचे प्रकार समोर येत आहे. महावितरणच्या वसुली विभागाचे कर्मचाºयांकडून मात्र ग्राहकांना कोणतीही पूर्व सूचना न देत्या त्यांचा विद्युतपुरवठा खंडित करण्याचा प्रकार सुरू आहे. नियमानुसार वीज बिल थकबाकीदार ग्राहकांना त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी सूचना देणे बंधनकारक आहे. परंतु, अशाप्रकारे कोणतही पूर्वसूचना न देता वसुली विभागाचे कर्मचारी विद्युत पुरवठा खंडित करीत असल्याने ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गणवेश, ओळखपत्राचा विसर
महावितरणकडून अनेक ग्राहकांना वीज बिल मिळण्यापूर्वीच कारवाई केली जात असल्याच्या घटना घडतात. काही ग्राहकांकडून एका महिन्याचे वीज बिल थकले तर असे ग्राहक दुसºया महिन्याचे वीज बिल प्राप्त होणाचा संपूर्ण बिलाची रक्कम एकदाच भरतात. मात्र महावितरणच्या वसुली अधिकाºयांकडून मार्चएण्डचे कारण देत दुसºया महिन्याचे वीज बिल ग्राहकांना मिळण्यापूर्वीच ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करतात. विशेष म्हणजे अशी कारवाई करताना अनेकदा वसुली अधिकारी आणि त्यांच्यासोबत असलेले लाइनमन गणवेशात नसतात. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे अधिकृत ओळखपत्रही नसते. अशा प्रसंगात ग्राहकांडून महावितरण विरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.