जिल्ह्यातील सव्वादोन लाख शिधापत्रिका आधारविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 12:57 AM2017-10-28T00:57:54+5:302017-10-28T00:58:00+5:30

सार्वजनिक वितरणप्रणाली व्यवस्थेंतर्गत गरीब व गरजू व्यक्तींना धान्य पुरवठा केला जातो. यात जिल्ह्यातील सात लाख ५६ हजार ६२७ शिधापत्रिकांची लिंकिंग आधारशी करण्याचे काम हाती घेण्यात आले असून, अद्यापही दोन लाख २५ हजार शिधापत्रिका आधार कार्डाशी संलग्न झालेल्या नसून अपग्रेडेशनचे काम वेगवेगळ्या तांत्रिक अडचणींमुळे मंदगतीने सुरू असल्याने उर्वरित आधार कार्ड संलग्निकरणासाठी सहा ते सात महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

 Without the support of the Savvadon Lakh ration card in the district | जिल्ह्यातील सव्वादोन लाख शिधापत्रिका आधारविना

जिल्ह्यातील सव्वादोन लाख शिधापत्रिका आधारविना

Next

नाशिक : सार्वजनिक वितरणप्रणाली व्यवस्थेंतर्गत गरीब व गरजू व्यक्तींना धान्य पुरवठा केला जातो. यात जिल्ह्यातील सात लाख ५६ हजार ६२७ शिधापत्रिकांची लिंकिंग आधारशी करण्याचे काम हाती घेण्यात आले असून, अद्यापही दोन लाख २५ हजार शिधापत्रिका आधार कार्डाशी संलग्न झालेल्या नसून अपग्रेडेशनचे काम वेगवेगळ्या तांत्रिक अडचणींमुळे मंदगतीने सुरू असल्याने उर्वरित आधार कार्ड संलग्निकरणासाठी सहा ते सात महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. जिल्हा पुरवठा कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक संघटनेच्या माध्यमातून गरीब व गरजू लोकांना धान्याचे व रॉकेलचे वितरण करण्यात येत असते. राज्य शासनाने अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत राज्यातील सर्वच शिधापत्रिकाधारकांचे कार्ड आधार कार्डाशी संलग्न करण्याचे काम हाती घेतले असून, जिल्ह्यात प्राधान्य कुटुंब लाभार्थींसह अन्य योजनेअंतर्गत एकूण शिधापत्रिकाधारकांची संख्या ७ लाख ५६ हजार ६२७ इतकी आहे. यात अंत्योदय बीपीएल व के शरी शिधापत्रिकांतून प्राधान्यक्रमाचे लाभार्थ्यांचा समावेश असून, यापैकी ५ लाख १० हजार शिधापत्रिका आधारकार्डाशी लिंक झाले आहेत. उर्वरित २ लाख २५ अद्यापही आधारकार्डाशी लिंकिंग झालेले नाही. जिल्ह्णात महिन्याला सरासरीत २५ ते ३० हजार शिधापत्रिकांचे संलग्नीकरण व दुरुस्तीचे काम सुरू असून, या गतीनेच संलग्नीकरणाचे काम सुरू राहिल्यास संलग्नीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याची प्रक्रिया जवळपास सहा ते सात महिने चालण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पाच लाख शिधापत्रिका संलग्न
जिल्ह्यात एकूण साडेसात लाख शिधापत्रिका असून, पाच लाख शिधापत्रिका आधारशी लिंक झाल्या आहेत. परंतु अद्यापही सव्वादोन लाख शिधापत्रिकांचे संलग्नीकरण व दुरुस्तीचे काम सुरू आहे. परंतु याचा धान्य पुरवठ्यावर कोणताही परिणाम झालेला नसून सर्व ७ लाख ५६ हजार ६२७ लाभार्थींना पुरवठा करण्यात येत आहे. यात आधार लिंक नसलेल्या; परंतु लाभार्थी असलेल्या शिधापत्रिकाधारकांचाही समावेश असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सोपान कासार यांनी दिली.

Web Title:  Without the support of the Savvadon Lakh ration card in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.