सीएस फाउंडेशनमध्ये साक्षी वाघ अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:15 AM2021-01-20T04:15:54+5:302021-01-20T04:15:54+5:30

नाशिक : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (आयसीएसआय़)ने कंपनी सेक्रेटरी अभ्यासक्रमाच्या फाउंडेशन परीक्षा २०२०चा निकाल जाहीर केला असून, ...

Witness tiger tops in CS Foundation | सीएस फाउंडेशनमध्ये साक्षी वाघ अव्वल

सीएस फाउंडेशनमध्ये साक्षी वाघ अव्वल

Next

नाशिक : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (आयसीएसआय़)ने कंपनी सेक्रेटरी अभ्यासक्रमाच्या फाउंडेशन परीक्षा २०२०चा निकाल जाहीर केला असून, या परीक्षेत नाशिकमधून साक्षी वाघ हिने अव्वल स्थान पटकावले आहे.

देशभरात २६ व २७ डिसेंबर रोजी १४९ केंद्रांसह दुबईतील एका केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल सोमवारी (दि.१८) नवी दिल्लीतील आयसीएसआय चॅप्टरने जाहीर केला आहे. यात देशभरातून ७०.२२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यात बेगळुरू केंद्रातून परीक्षा देणाऱ्या बालाजी बी.जी. यांनी देशात प्रथम, तर जबलपूर केंद्रातून प्रिया जैन व भायंदर केंद्रातून अपर्ण अग्रवाल यांनी संयुक्तरीत्या दुसरा क्रमांक पटकावला आहे. भुवनेश्वर येथील निखिता जैन व उत्तर कोलकात्यातून चिराग अग्रवाल यांनी संयुक्तरीत्या तिसरा क्रमांक राखला आहे. तर नाशिकमधून साक्षी वाघ हिने २७४ गुणांसह अव्वल स्थान पटकावले असून श्रेयम चांदरकर २७०, उज्ज्वल भुजबळ २२६ , प्रतीक अहिरराव २०२ व गौरी चव्हाण हिने २०० गुणांसह यश संपादन केले आहे. तर सीएसईईटीमध्ये श्रेयम चांदरकरसह तेजस रामचंदानी, समृद्धी जगताप, अंकिता यादव, हेमांदिनी खरवंदकर उत्तीर्ण झाल्याची माहिती इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाच्या नाशिक शाखेतर्फे देण्यात आली आहे.

Web Title: Witness tiger tops in CS Foundation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.