महिला आक्रमक : जलवाहिनीच्या कामास सुरूवात झाल्यानंतर आंदोलन मागे पाण्यासाठी वडाळागावात चार तास ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 12:25 AM2018-04-11T00:25:51+5:302018-04-11T00:25:51+5:30
इंदिरानगर : वडाळागावातील घरकुल योजनेतील इमारतीस पाणीपुरवठा होत नसल्याने नगरसेवक डॉ. दीपाली कुलकर्णी व लाभार्थ्यांनी केलेल्या सुमारे चार तास ठिय्या आंदोलनानंतर पाणीपुरवठा विभागाने जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
इंदिरानगर : वडाळागावातील घरकुल योजनेतील एका इमारतीस जलवाहिनीअभावी पाणीपुरवठा होत नसल्याने नगरसेवक डॉ. दीपाली कुलकर्णी व लाभार्थ्यांनी केलेल्या सुमारे चार तास ठिय्या आंदोलनानंतर पाणीपुरवठा विभागाने जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. वडाळागाव परिसरातील लाभार्थ्यांची पाहणी करून आणि त्यांची मूळ कागदपत्रे पाहून त्यांना शंभरफुटी रस्त्यालगत असलेल्या घरकुल योजनेत सोडत पद्धतीद्वारे टप्प्याटप्प्याने घरकुलांचे वाटप करण्यात आले. त्यानुसार २३ फेबु्रवारी रोजी रथचक्र चौकातील अजय मित्रमंडळाच्या सभागृहात नगरसेवक सतीश सोनवणे, डॉ. दीपाली कुलकर्णी, अॅड. श्याम बडोदे यांच्या हस्ते सोडत पद्धतीने चाळीस घरकुलांचे वाटप करण्यात आले, परंतु पाण्याअभावी फक्त वीसच लाभार्थी आपल्या कुटुंबासमवेत राहण्यास आले होते. पाच मजली इमारतीत रहिवाशांना इतर इमारतीच्या नळावरून पाणी भरावे लागत होते. त्रस्त लाभार्थ्यांनी अखेर नगरसेवक कुलकर्णी यांच्याकडे तातडीने पाण्याची सोय करावी, अशी तक्र ार केली. सदर तक्रारीची दखल घेत पाणीपुरवठा करीत सुमारे दहा ते पंधरा दिवसांपूर्वी पाण्याचे कॉमन मीटर बसवण्यात आले. परंतु वीस ते पंचवीस फूट जलवाहिनी न टाकल्यामुळे ए-८ इमारतीतील रहिवाशांना पाण्याअभावीच राहावे लागत होते. मंगळवारी (दि.१०) नगरसेवक डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना व बांधकाम विभागाच्या अधिकाºयांना तातडीने जलवाहिनी टाकण्याचे सांगितले असता त्यांनी एकमेकांवर जबाबदारी ढकलली. पाणीपुरवठा सुरू होत नाही तोपर्यंत कुलकर्णी यांच्यासह नागरिकांनी ठिय्या आंदोलनास सुरुवात केली. ठिय्या आंदोलनानंतर पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांना जाग आली आणि तातडीने जलवाहिनी टाकण्याच्या कामास सुरुवात झाल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.