महिला जळीत प्रकरणी मुख्य संशयितास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 02:05 AM2020-02-17T02:05:19+5:302020-02-17T02:05:45+5:30

लग्नाच्या वादातून झालेल्या झटापटीत लासलगाव बसस्थानकावर शनिवारी (दि. १५) एक महिला अंगावर पेट्रोल टाकून पेटल्याप्रकरणी फरार मुख्य संशयित रामेश्वर भागवत यास येवला येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. दरम्यान, गंभीररीत्या भाजलेल्या महिलेस अधिक उपचारासाठी रविवारी (दि. १६) पहाटे मुंबईच्या मसीना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे.

Woman arrested in connection with woman burnt case | महिला जळीत प्रकरणी मुख्य संशयितास अटक

संशयित रामेश्वर ऊर्फ बाला मधुकर भागवत याला ताब्यात घेताना पोलीस

Next
ठळक मुद्देपीडितेची प्रकृती स्थिर : उपचारासाठी मुंबईस हलविले

नाशिक/लासलगाव : लग्नाच्या वादातून झालेल्या झटापटीत लासलगाव बसस्थानकावर शनिवारी (दि. १५) एक महिला अंगावर पेट्रोल टाकून पेटल्याप्रकरणी फरार मुख्य संशयित रामेश्वर भागवत यास येवला येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. दरम्यान, गंभीररीत्या भाजलेल्या महिलेस अधिक उपचारासाठी रविवारी (दि. १६) पहाटे मुंबईच्या मसीना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे.
लासलगाव बसस्थानकाच्या आवारात लग्नाच्या वादातून शनिवारी महिला व संशयितांमध्ये झालेल्या झटापटीत अंगावर पेट्रोल सांडल्याने महिला ६७ टक्के भाजली होती. तिला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हिंगणघाट येथील घटनेनंतर लासलगावमध्ये घडलेल्या जळीत प्रकरणामुळे नागरिकात हळहळ व संतापही व्यक्त करण्यात आला. घटनेनंतर तत्काळ ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून घटनास्थळावरून फरार झालेल्या दोघा संशयितांना काही तासांत ताब्यात घेतले होते. त्यानंतर मुख्य संशयित रामेश्वर ऊर्फ बाला मधुकर भागवत यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने येवल्यामधून रविवारी सकाळी ताब्यात घेतले. सायंकाळी त्याला अटक करण्यात आली.
जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह रजेवर असताना सदर प्रकार समजताच त्या माघारी परतल्या व रात्री उशीरापर्यंत घटनेवर नियंत्रण ठेवून होत्या. रात्री पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शासकीय रूग्णालयाला भेट देऊन पीडितेच्या तब्येतीविषयी विचारपूस केली.
दरम्यान, शनिवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट देत पीडितेच्या प्रकृतीविषयी विचारपूस करून धीर दिला. त्यानंतर ठाकरे यांनी पीडितेची प्रकृती स्थिर होताच तिला अधिक औषधोपचारासाठी मुंबईला हलविण्याचा सल्ला दिला होता. यानुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी निर्णय घेत पीडितेला पुढील उपचारासाठी पहाटे विशेष रुग्णवाहिकेतून डॉक्टरांच्या पथकासह मुंबईच्या मसिना रुग्णालयात हलविले. दरम्यान, पीडितेच्या प्रकृतीत सुधारणा होत असून ही सकारात्मक बाब असल्याचे डॉ. जगदाळे यांनी सांगितले. त्यानंतर पीडितेचा भाऊ मुंबईला रवाना झाला आहे.
चौकशीनंतर दोघांना सोडले
लासलगाव येथील महिला जळीत प्रकरणातील ताब्यात घेतलेल्या दोघांना रविवारी पोलिसांनी सोडून दिले. या प्रकरणातील मुख्य संशयित रामेश्वर ऊर्फबाला मधुकर भागवत यास ताब्यात घेतल्यावर यापूर्वी पोलिसांनी ताब्यात घेतलेले दत्तू बाळा जाधव व नीलेश पद्माकर केंदळे यांना रविवारी सायंकाळी चौकशीनंतर सोडून दिले.

पेट्रोल पंप व्यवस्थापकासह कर्मचाऱ्याविरु द्ध गुन्हा
महिलेस बाटलीत पेट्रोल विक्र ी केल्याप्रकरणी पोलिसांनी लासलगाव येथील गुंजाळ पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापकासह कर्मचारी सागर आकाश शिंदे यांच्याविरु द्ध गुन्हा दाखल केला आहे. बसस्थानकावर येण्यापूर्वी महिलेने या पेट्रोल पंपावर बाटलीत पेट्रोल भरून घेत ते अंगावर ओतून घेतले होते. बाटलीत पेट्रोल देण्यास कायद्याने मनाई असताना महिलेस बाटलीमध्ये पेट्रोल दिल्याची जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी गंभीर दखल घेतली.

Web Title: Woman arrested in connection with woman burnt case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.