सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिलेस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2021 22:57 IST2021-10-11T22:57:05+5:302021-10-11T22:57:34+5:30
मालेगाव : शहरातील पाच कंदील भागातील सातारकर ज्वेलर्स या दुकानातून ८५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने विकत घेण्याच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या बेबी बेगम नसीम शेख (वय ५५, रा. काळी मशीदजवळ, औरंगाबाद) या महिलेस किल्ला पोलिसांनी अटक केली.

सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिलेस अटक
मालेगाव : शहरातील पाच कंदील भागातील सातारकर ज्वेलर्स या दुकानातून ८५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने विकत घेण्याच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या बेबी बेगम नसीम शेख (वय ५५, रा. काळी मशीदजवळ, औरंगाबाद) या महिलेस किल्ला पोलिसांनी अटक केली.
शनिवारी (दि. ९) सायंकाळी ही घटना घडली. दुकानाचे सेल्समन कैलास श्रावण वडनेरे (४६, रा. शरदनगर, कलेक्टरपट्टा) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. बेबी बेगम शेख ही महिला फिर्यादीच्या दुकानात दागिने विकत घेण्याच्या बहाण्याने आली असताना, तिला दाखवलेल्या १३ सोन्याच्या हारसेटपैकी एक ८५ हजारांचा सोन्याचा हार तसेच त्यासोबत दोन कानातील दागिने असा १९ ग्रॅम वजनाचा हारसेट चोरी केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक बोरसे करीत आहेत.