उसनवारीचे पैसे न दिल्याने महिलेला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 01:35 AM2021-03-24T01:35:22+5:302021-03-24T01:35:41+5:30
उसनवार घेतलेले पैसे परत केले नाही म्हणून मावसभावाच्या पत्नीला मारहाण करत विवस्त्र करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नणंदबाईला पोलीसांनी अटक केली आहे. हा प्रकार पिंप्राळे येथे घडला. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियाद्वारे थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पोहचल्यानंतर चौकशीची चक्रे वेगाने फिरत मारहाण करणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली.
नांदगाव : उसनवार घेतलेले पैसे परत केले नाही म्हणून मावसभावाच्या पत्नीला मारहाण करत विवस्त्र करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नणंदबाईला पोलीसांनी अटक केली आहे. हा प्रकार पिंप्राळे येथे घडला. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियाद्वारे थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पोहचल्यानंतर चौकशीची चक्रे वेगाने फिरत मारहाण करणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली.
पिंटु गंगाराम सोनवणे व अंबाबाई हे पती-पत्नी शेवगाव जि. अहमदनगर येथे गंगामाई साखर कारखाना येथे कामाला आहेत. हे दाम्पत्य पिंटु सोनवणे यांची सख्खी चुलत मावस बहिण संगीताबाई वाघ यांच्या टोळीमध्ये उस तोडणीचे काम करतात. संगीताबाई यांच्याकडून एक वर्षांपूर्वी पिंटु सोनवणे याने एक लाख साठ हजार रूपये घेतले होते. पिंटु यांनाही लाकडाच्या काठीने मारहाण केली, यात दोघे पती पत्नी जखमी झाले. याबाबत पिंटु सोनवणे यांनी नांदगाव पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार संगीताबाई वाघ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येऊन संगीताबाई वाघ यांना अटक करण्यात आली आहे.
n संगीताबाई वाघ रा. द्वारकानगर नांदगाव यांच्या समूहात हे दाम्पत्य कामाला न जाता दुसऱ्याच मुकादमाच्या टोळी बरोबर गेले. पिंप्राळे येथे परतल्याचे संगीताबाई वाघ यांना समजले. त्यांनी पिंटु सोनवणे यांच्याकडे उसनवार घेतलेल्या रूपयांची मागणी केली. तसेच हे दाम्पत्य दुसऱ्याच्या टोळीत कामाला गेल्याचा संगीताबाई यांना राग आल्याने या वादातून त्यांनी अंबाबाई यांना मारहाण करत त्यांना विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला.