पंचवटी पोलीस ठाण्यासमोर महिलेने स्वत:ला पेटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 12:20 AM2020-02-11T00:20:15+5:302020-02-11T01:09:20+5:30

आपल्या इच्छेविरुद्ध विवाह लावून दिल्याचा आरोप करत अवघ्या आठवडाभरातच पतीच्या जाचाला कंटाळून घर सोडणारी मुलगी माहेरी व सासरी जात नाही, म्हणून नैराश्यापोटी तिच्या आईने पंचवटी पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावरच रॉकेल ओतून घेत स्वत:ला पेटवून घेतल्याची घटना सोमवारी (दि.१०) संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली.

The woman burnt herself in front of the Panchavati police station | पंचवटी पोलीस ठाण्यासमोर महिलेने स्वत:ला पेटविले

पंचवटी पोलीस ठाण्यासमोर महिलेने स्वत:ला पेटविले

googlenewsNext
ठळक मुद्देप्रकृती चिंताजनक : मुलगी सासरी जात नसल्याने केले कृत्य; जिल्हा रुग्णालयाच्या जळीत कक्षात उपचारार्थ दाखल

नाशिक : आपल्या इच्छेविरुद्ध विवाह लावून दिल्याचा आरोप करत अवघ्या आठवडाभरातच पतीच्या जाचाला कंटाळून घर सोडणारी मुलगी माहेरी व सासरी जात नाही, म्हणून नैराश्यापोटी तिच्या आईने पंचवटी पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावरच रॉकेल ओतून घेत स्वत:ला पेटवून घेतल्याची घटना सोमवारी (दि.१०) संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मुलीचे वडील अमरितसिंग यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात येऊन ‘माझी मुलगी रायपूर येथून बेपत्ता झाली असून, ती नाशिकला तिच्या मैत्रिणीकडे राहते, तिला पोलीस स्टेशनला बोलावून घ्या व तिचे म्हणणे जाणून तसे लेखी लिहून घ्या’ असे सांगिंतले. त्यामुळे पोलिसांनी तिला तिच्या पालकांसमक्ष चौकशीकरिता बोलावून घेतले होते. संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास ती आपल्या मैत्रिणीसोबत आली. यावेळी तिने सासरी व माहेरी जाण्यास नकार देत दोन्ही ठिकाणाहून मला त्रास आहे, मी सक्षम असून मला कोणीही बळजबरी करू शकत नाही. मी माझ्या जबाबदारीवर मैत्रिणीकडे राहायला जात असल्याचे पोलिसांना लेखी दिले.
त्यानंतर पंचवटी पोलीस ठाण्यातून बाहेर पडताना प्रवेशद्वारावर आवारात मुलीची आई हरजिंदर अमरितसिंग संधू (५५, रा. कृष्णनगर, पंचवटी) यांनी स्वत:च्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या नातेवाइकांच्या ही बाब लक्षात येताच तत्काळ अंगावरील शर्ट काढून पेटलेल्या हरजिंदर यांना विझविण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनीही त्यांच्या दिशेने मदतीसाठी धाव घेतली. हरजिंदर यांना तत्काळ चारचाकी वाहनातून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर जळीत कक्षात उपचार सुरू असून, प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, १८ जानेवारी २०२० रोजी हरजिंदर यांच्या मुलीचा विवाह झाला होता. मुलीने दोन दिवसांपूर्वी रायपूरवरून नाशिक गाठले. ती गंजमाळ येथील मैत्रिणीच्या घरी राहत होती. पोलिसांनी जबाब नोंदवून झाल्यानंतर बाहेर पडताना आलेल्या नैराश्यापोटी पोलीस ठाण्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ हरजिंदर यांनी अंगावर पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

दुचाकीच्या डिक्कीत पेट्रोलची बाटली
पोलीस ठाण्यातून बाहेर पडताना प्रवेशद्वाराजवळच हरजिंदर यांनी स्वत:च्या अ‍ॅक्टिवाच्या डिक्कीमधून पेट्रोलने भरलेली बाटली काढली. कोणाला काही समजण्याच्या आतच त्यांनी पेट्रोल अंगावर ओतून घेत स्वत:ला पेटवून घेतले. यावेळी त्यांचे पती, भाऊ, चुलते व परिसरातील नागरिकांनी धावत जाऊन त्यांना विझविले.
४या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. अत्यवस्थेत त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: The woman burnt herself in front of the Panchavati police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.