इगतपुरी रेल्वेस्थानकात महिलेने दिला बाळाला जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2022 12:42 AM2022-02-10T00:42:39+5:302022-02-10T00:43:31+5:30

प्रवासात गर्भवती महिलांसह अनेक गरजू रुग्णांसाठी तत्परता दाखवून रेल्वे प्रशासन नेहमीच सक्रिय भूमिका बजावते. अशाच एका घटनेत मंगळवारी (दि. ८) प्रियांका शर्मा नामक गर्भवती महिला लोकमान्य टिळक टर्मिनस ते फुलपूर कामायनी एक्स्प्रेसमधून प्रवास करीत असताना कसारा आणि इगतपुरीदरम्यान तिला प्रसूती वेदना जाणवू लागल्या. यावेळी प्रसंगाचे गांभीर्य ओळखत रेल्वे विभागाने सूत्रे हलवली आणि स्थानकातील प्रतीक्षालयात महिलेची प्रसूती सुखरूप पार पाडली.

Woman gives birth to baby at Igatpuri railway station | इगतपुरी रेल्वेस्थानकात महिलेने दिला बाळाला जन्म

इगतपुरी रेल्वेस्थानकात महिलेने दिला बाळाला जन्म

googlenewsNext
ठळक मुद्देरेल्वेची तत्पर सेवा : महिलेसह बाळ सुखरूप

इगतपुरी : प्रवासात गर्भवती महिलांसह अनेक गरजू रुग्णांसाठी तत्परता दाखवून रेल्वे प्रशासन नेहमीच सक्रिय भूमिका बजावते. अशाच एका घटनेत मंगळवारी (दि. ८) प्रियांका शर्मा नामक गर्भवती महिला लोकमान्य टिळक टर्मिनस ते फुलपूर कामायनी एक्स्प्रेसमधून प्रवास करीत असताना कसारा आणि इगतपुरीदरम्यान तिला प्रसूती वेदना जाणवू लागल्या. यावेळी प्रसंगाचे गांभीर्य ओळखत रेल्वे विभागाने सूत्रे हलवली आणि स्थानकातील प्रतीक्षालयात महिलेची प्रसूती सुखरूप पार पाडली.

ऑन-बोर्ड टीसी कर्मचाऱ्यांनी सदर महिलेला प्रसूतिवेदना होत असल्याची माहिती इगतपुरीचे उपस्टेशन व्यवस्थापक आनंद शिंदे यांना कळविली. प्रसंगाचे गांभीर्य ओळखत रेल्वे विभाग कामाला लागला. संदेश मिळाल्यावर आनंद शिंदे यांनी इगतपुरी स्टेशनवर वैद्यकीय महिला डॉक्टर आणि महिला आरपीएफ कॉन्स्टेबल यांची तातडीने येण्याची व्यवस्था केली. अतिरिक्त विभागीय वैद्यकीय अधिकारी आणि पथक उपस्थित झाल्यानंतर रुग्णाला तपासून इगतपुरी येथेच थांबण्याचा सल्ला दिला. दरम्यान, प्रसूतिवेदना असलेल्या प्रियांका या महिलेने रेल्वे वैद्यकीय पथकाच्या मदतीने सायंकाळी ५.१५ वाजता स्थानकाच्याच प्रतीक्षालयातच एका निरोगी बाळाला जन्म दिला.

नवजात बालक व महिलेला प्रसूतीनंतर उपचारासाठी रुग्णवाहिकेद्वारे इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.

रेल्वे विभागाने तत्काळ केलेल्या मदतीमुळे प्रवासी महिलेला योग्य वेळी वैद्यकीय मदत मिळू शकली.

Web Title: Woman gives birth to baby at Igatpuri railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.