पेठ तालुक्यात कोरोनाने महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 10:45 PM2020-08-11T22:45:15+5:302020-08-12T00:07:56+5:30
पेठ : शहरात कोरोना संपुष्टात येऊन तालुका कोरोनामुक्त झाला असताना पेठ व त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या शेवखंडी गावात कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाल्याने प्रशासन व नागरिक सतर्क झाले आहेत.
पेठ : शहरात कोरोना संपुष्टात येऊन तालुका कोरोनामुक्त झाला असताना पेठ व त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या शेवखंडी गावात कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाल्याने प्रशासन व नागरिक सतर्क झाले आहेत.
शेवखंडी येथील महिलेला नाशिकला दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला असून, संपर्कातील १४ जणांना पेठच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या घशाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. संबंधित महिलेच्या घराचा परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला आहे.
आरोग्य विभागाच्या वतीने गावात आरोग्य सर्वेक्षण व उपचार सुरू करण्यात आल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोतीलाल पाटील यांनी सांगितले. नागरिकांनी सतत हात धूवावे, गर्दीत जाणे टाळावे असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.