बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 05:34 PM2020-08-08T17:34:27+5:302020-08-08T17:34:57+5:30
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. शनिवारी (दि.८) चिंचले खैरे गावात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक महिला ठार झाली आहे. या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

इगतपुरी तालुक्यातील चिंचले खैरे येथील भोराबाई महादू आगीवले (६०) रात्री जेवन झाल्यानंतर आपल्या घरात झोपल्या होत्या. मात्र घराचा दरवाजा उघडा होता. पहाटेच्या सुमारास बिबट्याने घरात प्रवेश करत भोराबाईवर हल्ला केला. त्यांना सुमारे अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत ओढत नेले. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने भोराबाई यांचा मृत्यू झाला.
सकाळी कुटुंबातील सदस्य महिला भोराबार्इंच्या खोलीकडे चहा घेऊन गेले असता त्या दिसल्या नाही. यामुळे कुटुंबीयांनी शोध घेण्यास सुरुवात केली. घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर दारणा नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे, वनपरिमंडल अधिकारी पी. के. डांगे, वनसरंक्षक के. के. हिरे व एम.बी. धादवड यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी इगतपुरी ग्रामीण रु ग्णालयात पाठवण्यात आला आहे.